📣 मोठी बातमी ! – आता 14 डिसेंबर 2023 पर्यंत करता येणार फ्री मध्ये आधारकार्ड अपडेट – UIDAI ची मोठी घोषणा

Govt. Update

🖊️ UIDAI ने आता आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. केंद्र सरकारने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सलग दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे.

🧐 तुम्हाला माहिती असेल, यापूर्वी आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम तारीख 14 जून 2023 निश्चित करण्यात आली होती.

📝 त्यानंतर ती 14 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. अशातच आता पुन्हा एकदा UIDAI ने ही सुविधा 14 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.

👉 असे करा आधार कार्ड अपडेट

▪️ सर्वात आधी UIDAI च्या myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाइटवर जा.
▪️ त्यानंतर 12 अंकांचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा.
▪️ पुढे ओटीपीचा पर्याय निवडा, त्यानंतर मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.
▪️ ओटीपी टाकून ‘अपडेट आधार ऑनलाइन’ हा पर्याय निवडा.
▪️ ‘प्रोसीड टू अपडेट आधार’ हा पर्याय निवडा, विचारलेली माहिती भरा.
▪️ त्यानंतर तुमचे आधार कार्ड अपडेट होईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *