शिंदे आणि ठाकरेंची धाकधुक वाढली! आमदार अपात्रतेप्रकरणी आज होणार सुनावणी,नार्वेकरांच्या निर्णयाकडे लक्ष…

Disqualification of MLAs Hearing : राज्यातील आमदारांच्या अपात्रतेच्या (Disqualification of MLAs) मुद्द्याचं भिजच घोंगडं ठेवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्षांवर कडक ताशेरे ओढले होते. त्यानंतर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिकांवर आज (सोमवारी) सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र विधिमंडळाने दोन्ही गटांतील 54 आमदारांना नव्याने नोटीस बजावून आज (25) दुपारी 3 वाजता सुनावणीसाठी बोलावले आहे. मागील सर्व अपात्रता याचिका एकत्र करून ही नोटीस जारी करण्यात आली आहे. विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी होणार आहे.

नोटीसमध्ये म्हटले आहे की, अपात्रतेसंबंधीच्या याचिका क्रमाकं १ ते ३४/२०२२ यांची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज (सोमवारी) दुपारी तीन वाजता विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये सुनावणी होणार आहे. आपण यावेळी उपस्थित राहावे, असं नोटिशीत म्हटलं आहे. सुनावणीच्या वेळी गरज पडल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्या प्रमुखांनाही सुनावणीसाठी बोलावण्यात येईल, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.या सुनावणीसाठी ठाकरे गटाच्या १४ तर शिंदे गटाच्या ३९ आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.

नगर-कल्याण महामार्गावर भरधाव कारने पाच शेतमुजरांना चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू, २ गंभीर जखमी

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदारांनी बंडाळी केल्यानं शिवसेनेत फूट पडली आहे. यानंतर ठाकरे गटाकडून शिंदे समर्थक आमदारांविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या आमदारांना अपात्र घोषित करावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह दिल्यानंतर शिंदे समर्थक आमदारांच्या वतीनेही याचिका दाखल करण्यात आली होती. १४ सप्टेंबर अपात्रतेच्या संदर्भात सुनावणी झाली. मात्र, त्यावेळी नार्वेकरांनी सुनावणी पुढे ढकलली होती.

त्यानंतर ठाकरे गटाकडून नार्वेकर वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला गेला. दरम्यान, याचिकांच्या सुनावणीबाबत अध्यक्षांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची तक्रार करत उबाठाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली. त्यावर गेल्या आठवड्यात यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मुदतीत सुनावणी घेण्याचे स्पष्ट निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले होते. त्यानंतर आता या प्रकरणाची प्रत्यक्ष सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू झाली आहे.

14 सप्टेंबर रोजी झालेल्या पहिल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज या प्रकरणातील दुसरी सुनावणी होत आहे. 14 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत शिंदे आणि ठाकरे गटाला कागदपत्रे एकमेकांकडे देण्यास सांगण्यात आले होते. याशिवाय याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना दहा दिवसांत उत्तर देण्यासाठी मुदत देण्यात आली होती.

दरम्यान, आज अपात्रतेसंदर्भात सुनावणी होणार आहे. अपात्रतेपूर्वी पक्ष कुणाचा यावर अध्यक्ष काय निर्णय घेतात, याकडेही सगळ्याचं लक्ष आहे. जून 2022 मध्ये ठाकरे गटाकडून अस्तित्वात असलेला पक्ष आणि प्रतोद हा मुद्दाच लावून धरला जाणार असल्याचं बोलल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *