पत्रकारांनी विरोधात बातमी छापू नये यासाठी त्यांना धाब्यावर न्या; बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना सल्ला

अहमदनगर : आगामी वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. पुढील वर्षात अनेक राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पीएम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचा पराभूत करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली.तर भाजपनेही (BJP) विरोधकांचा सामना करण्यासाठी जोरदार कंबर कसली. दरम्यान, 2024 पर्यंत पत्रकारांनी आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असं सांगत त्यांना धाब्यावरही घेऊन जा, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी दिला.

बावनकुळे यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 24) शहरातील सावेडी येथील माऊली सभागृहात महाविजय 2024 विधानसभा पदाधिकाऱी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना बुथ रचना व पदाधिकाऱ्यांनी पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन केले. सध्या भाजपविषयी जनमाणसात नकारात्मकता आहे. ही नकारात्मता अशीच वाढत राहिली तर आगामी निवडणुकांत याचा भापजला फटका बसू शकतो.

त्यामुळं या कार्यक्रमात बोलतांना बावनकुळे म्हणाले, ज्या बूथवर तुम्ही काम कराल तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लोक कोण आहेत, पोर्टलवाले कोण आहेत, हे पाहावं. आपण एवढं चांगलं काम करतोय, पण हे असं काही टाकतात की जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत, त्यांची यादी तयार करा. यात एक, दोन पोर्टलवाले, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिकवाले असतील, त्यांना महिन्यातून एकदा चहासाठी बोलवा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे, समजलेच असेल तुम्हाला. त्यात काही कमी जास्त झालं तर सुजय विखे आहेतच, असं त्यांना सांगितलं. असं वृत्त लोकमतने दिलं.

त्यासोबतच महाविजय 2024 पर्यंत बूथच्या संदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाही याची काळजी घ्या, सर्व सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत, याची काळजी घ्या, असं बावनकुळे म्हणाले.दरम्यान, बावनकुळे यांच्या उपस्थितीत नगर शहरातील माणिक चौकात मन की बात हा कार्यक्रम झाला. त्यानंतर त्यांनी तेलीखुंट पर्यंत पायी जात नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे नागरिकांना विविध ठिकाणी स्वागत केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *