भाजप खासदाराविरुद्ध सुळेंनी दिली हक्कभंगाची नोटीस, नेमका वाद काय ?

Supriya Sule : भाजप खासदार रमेश बिधुरी (Ramesh Bidhuri) यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्याबाबत भर संसदेत अपशब्द वापरले. त्यांच्या या वक्तव्यावरून प्रचंड संताप व्यक्त होत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सुद्धा आक्रमक झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी रमेश बिधुडी यांच्या विरोधात थेट हक्कभंगाची नोटीस धाडली आहे. त्यामुळे आगामी काळात हा वाद अधिक वाढणार असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपला घेरण्यासाठी इंडिया आघाडीला (India Alliance) एक मुद्दा भेटल्याची चर्चा यानिमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Lok Sabha Election 2024: अखेर जेडीएसची भाजपबरोबर युती ! लोकसभा निवडणूक एकत्र लढणार

खासदार बिधुरी यांनी केलेले वक्तव्य हक्कभंगाच्या कारवाईत बसते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी सुळे यांनी या नोटीसद्वारे केली आहे. बिधुडी यांचे वक्तव्य लोकसभेच्या प्रतिष्ठेला ठेच देणारे आहे. नियमानुसार हे वक्तव्य हक्कभंगाच्या कारवाईत बसते त्यामुळे यात हस्तक्षेप करत प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठवा, असेही सुळे म्हणाल्या.

नेमकं काय घडलं होतं ?
लोकसभेत चांद्रयान 3 मोहिमेसंदर्भात चर्चा सुरू होती. या मुद्द्यावर भाजप खासदार बिधुरी बोलत असताना त्यांना बसपा खासदार दानिश अली यांनी मध्येच टोकलं त्यामुळे बिधुरी चांगलेच भडकले. त्यांनी दानिश अली यांना उद्देशून अपशब्द वापरले. त्यावरून संसदेत प्रचंड गदारोळ झाला. सभापतींनीही बिधुरी यांना चांगलेच फटकारले. तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षाातील नेत्यांनी केली. आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. सुळे यांनी हक्कभंगाची नोटीस दिली असून नियमानुसार भाजप खासदार रमेश बिधुरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता त्यांच्या या नोटीसवर काय निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

India Canada Row : गुंतवणूकदारांना धक्का! कॅनडातील सर्व व्यवसाय बंद करण्याचा महिंद्रांचा निर्णय

खासदार रमेश बिधुरी यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन विरोधी पक्षांकडून घणाघाती टीका सुरु झाली आहे. विरोधकांनी या घटनेवरुन संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सभागृहातच दिलगिरी व्यक्त केली. त्यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, सत्ताधारी सदस्याच्या कोणत्याही वक्तव्याने विरोधी पक्षांच्या भावना दुखावल्या असल्यास त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह कालच म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *