अजेंडा 2024, आता भारत विरुद्ध कॅनडा; ठाकरे गटाकडून मोदी सरकार लक्ष्य

India Canada Conflict : खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येत भारताचा हात (India Canada Conflict) असल्याचा आरोप करत कॅनडाच्या (Canada) पंतप्रधानांनी खळबळ उडवून दिली. मात्र, त्यांच्या या आरोपांनंतर भारत आणि कॅनडा (Canada India Relation) यांच्यातील वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. ट्रुडो (Justin Trudeau) यांच्या आरोपांनंतर भारत सरकारनेही जशास तसे उत्तर दिले. कॅनडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. त्यानंतर कॅनडा सरकारने आपल्या नागरिकांसाठी ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी करत जम्मू काश्मीरसह पाकिस्तानीला हद्दीला लागून असलेली राज्ये आणि इशान्य भारतातील राज्यात प्रवास टाळण्याचा सल्ला दिला, अशा पद्धतीने हा वाद चिघळत चाललेला असतानाच आता या वादात ठाकरे गटाने उडी घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सामनाच्या अग्रलेखात आज या वादावर मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे.

India Canada Row मुळं महागाई वाढणार; सर्वसामान्यांच्या किचनचं बजेट बिघडणार?

हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारतीय अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप जस्टिन ट्रुडोसाहेबांनी केला पण, त्याचे पुरावे ते देत नाहीत. हा त्यांचा कॅनडातील खलिस्तानी चळवळ्यांची राजकीय सहानुभूती मिळवण्याचा डाव आहे. ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत आरोप करून भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न केला पण, युरोपियन राष्ट्रांनी त्यांना फारसे गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. जस्टिन ट्रुडो हे पोरकट बुद्धीचे पुढारी आहेत. असे लोक आपल्या देशातही सत्ताधारी पक्षात आहेत, असे या लेखात म्हटले आहे.

अजेंडा 2024, भारत विरुद्ध खलिस्तान
2024 च्या निवडणुकांसाठी भारत पाकिस्तान हा गुळगुळीत विषय झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानची जागा आता खलिस्तान घेईल असे चित्र स्पष्ट झाले आहे. भारताला खलिस्तान चळवळ्यांपासून धोका आहे. त्यामुळे भाजप व मोदींना मते द्या, हा उद्या प्रचाराचा मुद्दा बनला तरी आश्चर्य वाटायला नको. पाकिस्तान काय किंवा खलिस्तान काय, आपल्या देशात राजकारण व निवडणुकांसाठी काहीही चालू शकते. कॅनडा विरुद्ध भारत हा सामना आता भारत विरुद्ध पाकिस्तानची जागा घेत आहे व त्यात खलिस्तानचा मुद्दा असल्याने प्रकरणाकडे गंभीर पद्धतीन पहायला हवे, असा सल्ला या लेखातून ठाकरे गटाने दिला आहे.

India Canada Row : निज्जरच्या हत्येनंतर कॅनडातील हिंदूंना 1985 सारखी भीती; वाचा काय घडलं होतं?

कॅनडाच्या भुमीवरून भारतविरोधी कारवायांना बळ मिळत आहे. टोरंटो, व्हॅन्कुव्हर येथे खलिस्तानी विचारांचे लोक एकत्र जमतात व ते भारताचे तुकड करण्याची बेलगाम भाषा करतात, जस्टिन ट्रुडो हे यावर निर्लज्जपणे मत व्यक्त करतात की हे तर त्या लोकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. एका देशाच्या फाळणीची भाषा, हिंसाचाराची भाषा करणाऱ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली राजकीय संरक्षण देणे ही मुर्खांची लक्षणे आहेत, अशा शब्दांत ठाकरे गटाने ट्रुडो यांनाही फटकारले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *