‘मला मनोहर जोशींचं घर जाळायला सांगितलं होतं’; आमदाराच्या गौप्यस्फोटाने खळबळ

मला मनोहर जोशींचं घर जाळायला सांगितलं असल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केला आहे. मुंबईत आयोजित कार्यक्रमादरम्यान, सदा सरवणकर यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. सरवणकरांच्या या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून त्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

सदा सरवणकर म्हणाले, माझं विधानसभेचं तिकीट कापल्यानंतर मला खासदार संजय राऊत यांनी ‘तू मोर्चा घेऊन. मग तू असाच जाऊ नकोस. पेट्रोल घेऊन जा, जाळून टाक त्यांचं घर.. काही शिल्लक ठेवू नकोस’ असं सांगण्यात आलं असल्याचं सदा सरवणकर म्हणाले आहेत.

संजय राऊतांनी सांगितल्यानंतर मी मनोहर जोशींच्या घरी निघालो होतो, तेराव्या माळ्यावर शिवसैनिक चालत गेले. मात्र, तिथे पंधरा ते वीस शिवसैनिक होते, जे कधीच नसतात. घराच्या आजूबाजूला काही व्हिडिओ कॅमेरे घेऊन लोक उभे होते. चॅनेलचेही लोक होते. तरीही आम्ही आदेश पाळायचा म्हणून जे पुढे गेलो. त्यानंतर जी घटना घडली ती सर्वांनाच माहिती असल्याचं सदा सरवणकरांनी सांगितलं आहे.

मला विधानसभेची उमेदवारी न दिल्याने मी काय करु असं विचारल्यानंतर मला सांगण्यात आलं की, सदा तुला तुझी ताकद दाखवावीच लागणार आहे, त्यामुळे तू मातोक्षीवर शिवसैनिक घेऊन जा, मी मी मातोश्रीवर गेलो, उद्धव ठाकरे बसलेले होते, ते म्हणाले होते, की मला वाटत होतं की तूच निवडून येशील पण तूच आमचा उमेदवार पण आता काय करणार? तुला आम्ही उमेदवारी नाही देऊ शकत आणि कारणही नाही सांगू शकत, असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं सरवणकरांनी सांगितलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये कायमच आरोप-प्रत्यारोपाचं सत्र अद्यापही सुरुच आहे. याआधीही भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून उद्धव ठाकरेंसह त्यांच्या गटातील नेत्यांवर खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत, मात्र,आता पहिल्यांदाच सदा सरवणकर यांनी थेट खासदार संजय राऊत यांच्याबद्दल हा गौप्यस्फोट केल्याने या मुद्द्यावर संजय राऊत काय बोलणार? याकडं अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *