‘मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष’म्हणणाऱ्यांना सुप्रियाताईंचं जोरदार प्रत्त्युत्तर; म्हणाले, राष्ट्रीय अध्यक्ष..,

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं जोरदार प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मीच राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणणाऱ्यांना दिलं आहे. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन चांगलाच वाद उफाळल्याचं दिसून येत आहे. अजित पवार गटाकडून राष्ट्रीय अध्यक्षपदावर दावा सांगण्यात येत असतानाच आता सुप्रिया सुळेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आपल्या देशात लोकशाही असून लोकांना हवं ते बोलू शकतात, त्याचा अर्थ ते बोलत आहेत ते सत्य आहे असं नाही. खरंतर कुठलीही व्यक्ती पक्षाचा मालक नसते. जनता ही खरी मालक आहे. १९९९ साली जेव्हा पक्षाची स्थापना झाली तेव्हापासूनच शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि जयंत पाटील मागील काही वर्षांपासून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं आहे.

तसेच मागील आठवड्यात कोल्हापुरातल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी आपणच राष्ट्रवादीचा अध्यक्ष असल्याचं स्पष्ट केलं. एवढंच नाहीतर जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष असल्याचंही त्यांनी म्हंटलं असल्याचं सुप्रिया सुळेंनी यावेळी सांगितलयं.

काय म्हणाले होते सुनिल तटकरे?
अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असून आम्ही निवडणूक आयोगाकडे जे निवेदन दिलंय त्यामध्ये आम्ही तेच म्हटलं आहे. आम्हाला खात्री आहे की, निवडणूक आयोग आमच्या बाजूने निर्णय घेईल.

दरम्यान, शिवसेनेत झालेल्या बंडांनतर शिवसेना कोणाची? हा प्रश्न उपस्थित झाला होता, तेव्हा हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेलं होतं, आताही राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा वाद आता निवडणूक आयोगाच्या उंबरठ्यावर गेला आहे, या प्रकरणात दोन्ही गटाकडून अध्यक्षपदावर दावा करण्यात आला असून राष्ट्रवादी अध्यक्ष नेमका कोण? याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *