…म्हणूनच मला नागाची उपमा दिलीयं; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर बांगराचा पलटवार

नाग शेतकऱ्यांचा मित्र अन् शंकराच्या गळ्यात म्हणूनच उद्धव ठाकरेंनी(Udhav Thackeray) मला नागाची उपमा दिली असल्याचा पलटवार शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर(Santosh Bangar) यांनी केला आहे. हिंगोलीत आज उद्धव ठाकरे यांची निर्धार सभा पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावरुन आता संतोष बांगर यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

संतोष बांगर म्हणाले, उद्धव ठाकरेंचं माझ्यावर विशेष प्रेम आहे, माझा ते गौरव करणार हे मला माहित होतं, त्यांचं माझ्यावर प्रेम म्हणूनच त्यांनी मला नागाची उपमा दिली आहे, संतोष बांगर हा नागनाथाचा भक्त असून नाग शेतकऱ्यांचा मित्र असतो, हा नाग शंकराच्याही गळ्यात असतो म्हणूनच ही उपमा मला दिली असल्याचं संतोष बांगर म्हणाले आहेत.

तसेच मी शिवसेनेत जिल्हाप्रमुख 2008 पासून आहे, आत्तापर्यंत 17 केसेस माझ्यावर दाखल आहेत, प्रत्येकवेळी मी आरेला कारे उत्तर दिलं आहे, तेव्हा हेच उद्धव ठाकरे संतोष बांगरसारखा शिवसैनिका पाहिजे, अशी उपमा देत होते, असंही ते म्हणाले आहेत. आता त्यांना काय झालं, असावं हे माहित नाही पण बोलण्यासारखं खूप काही आहे, मी बोलणं टाळत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे यांना 12 वर्ष माझ्या बेंडकुळ्या पाहिल्या आहेत, जरा काही झालं की लगेच मला फोन करायचे, उद्धव ठाकरे यांनी रस्त्याने जाताना माझ्या बेंडकुळ्या पाहिल्या आहेत, त्यामुळे यातच मला आनंद असल्याचं ते म्हणाले आहेत.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
दादागिरी सहन करणार नाही इथपर्यत ठीक आहे पण आपल्याच लोकांवर उद्धटपणा करणार असेल तर त्याचा उद्धटपणा चिरडून तुम्हाला टाकावा लागेल. हे सांगण्यासाठी मी आज तुमच्याकडे आलो आहे, असा हल्लाबोल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर केला आहे.

दरम्यान, सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांसमोर उभा ठाकला आहे. एकीकडे शासन आपल्या दारी कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल चढवत आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरेही निर्धार सभेतून टोलेबाजी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *