केरला स्टोरी फेम अदाने खरेदी केला सुशांतसिंह राजपूतचा फ्लॅट? कोट्यांवधींमध्ये डील झाल्याची चर्चा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने (Actor Sushant Singh) 14 जून 2020 रोजी आत्महत्या करत मृत्यूला कवटाळले. मुंबईतील त्याच्या मॉन्ट ब्लँक अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये तो मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूनंतर हा फ्लॅट रिकामा आहे. या फ्लॅटमध्ये जाण्यास किंवा राहण्यास कोणीही तयार झालेले नाही. दरम्यान, आता सुशांतचा हा फ्लॅट विकला जात आहे. द केरळ स्टोरी फेमच्या अदा शर्माने (Adah Sharma) सुशांत सिंग राजपूतचा फ्लॅट खरेदी केला असल्याची माहिती मिळत आहे. (Actor Sushant Singh’s flat was bought by Adah Sharma of The Kerala Story fame)

अदा शर्मा मॉन्ट ब्लँक अपार्टमेंटमध्ये फ्लॅट खरेदी करत असल्याची पोस्ट व्हायरल झाली होती. यानंतर TellyChakkar या पोर्टलच्या टीमने अदाच्या टीमशी संपर्क साधून ही बातमी खरी असल्याचा दावा केला आहे. सध्या अदाने हे घर नेमके किती किमतीत विकत घेतले किंवा कधी खरेदी केले याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र या फ्लॅटची डील कोट्यांवधी रुपयांना झाली असाल्याचे सांगितले जात आहे. अदा आता इथे कधीपासून राहायला जाणार याबाबतही तिने माहिती दिलेली नाही.

अभिनेत्री अदा शर्माला ‘द केरळ स्टोरी’मधील भूमिकेसाठी प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातून अदाच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे. सोशल मीडियावर मोठ्या संख्येने लोक त्याला फॉलो करू लागले आहेत. चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री लवकरच नवीन घर घेण्याच्या तयारीत आहे. अदा शर्मा तिची टीम आणि ब्रोकरसोबत सुशांतच्या मॉन्ट ब्लँक अपार्टमेंटमधील घरी जाताना दिसली.

अभिनेत्री अदा शर्माला ‘द केरळ स्टोरी’मधील भूमिकेसाठी प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातून अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे. सोशल मीडियावर मोठ्या संख्येने लोक त्याला फॉलो करू लागले आहेत. अदा शर्माने 1920 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या हॉरर चित्रपटात तिने लिसा नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. मात्र या चित्रपटातनंतर तिला थेट केरला स्टोरीमधून ओळख मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *