‘मोबाईलचा नाद लै बेकार’ म्हणत सलील कुलकर्णीने केलं ‘सा रे ग म प…’पाहण्याचा आवाहन

SaReGaMaPa Li’l Champ : गाण्यांच्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये झी मराठीच्या ‘सा रे ग म प Li’L Champs’या शोचं नाव अग्रस्थानावर आहे. या कार्यक्रमाने नेहमीच बालकांच्या आवाजाला एक मोठं व्यासपीठ दिलं आहे. त्यातून अनेक बाल कलाकारांनी गाण्यामध्यें आपलं करिअर घडवलं आहे. या कार्यक्रमाचे सर्वात गाजलेले गायक म्हणजे रोहीत राऊत, कार्तिकी गायकवाड, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैंशपायन, आर्या आंबेकर या गायकांची नाव घेतली जातात.

त्याच ‘सा रे ग म प Li’L Champs’ आणखी एक पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यात आता देखील चिमुकल्यांच्या आवाजाला एक चांगलं व्यासपीठ मिळणार आहे. त्यामध्ये सुत्रसंचलानाच काम अभिनेत्री मृण्मयी देशपांडे करणार आहे. तर सलील कुलकर्णी या कार्यक्रमाचे ज्युरी मेंबरमध्ये असणार आहे. या कार्यक्रमाचा एक प्रोमो नुकताच समोर आला. यामध्ये सलील कुलकर्णी आणि मृण्मयी देशपांडे हीने एका भारूडाच्या माध्यमातून मोबाईल वापराविषयी संदेश देत कार्यक्रम पाहण्याचं आवाहन देखील केलं आहे.

काय म्हणाले सलील आणि मृण्मयी?
भारूड या संत एकनाथ महाराजांच्या भक्ती गीत प्रकारामध्ये सलील कुलकर्णी आणि मृण्मयी देशपांडे हीने एक गाणं यावेळी मंचावर सादर केलं. त्यात त्यांनी भारूडाच्या माध्यमातून मोबाईल वापराविषयी संदेश देत कार्यक्रम पाहण्याचं आवाहन देखील केलं आहे. यामध्ये ते म्हणत आहेत की, ‘मोबाईलचा नाद लै बेकार’ आहे. त्याचा नाद मुलांनी सोडावा आणि त्या ऐवजी ‘सा रे ग म प Li’L Champs’ पाहावं.

रिजार्च संपला रिला थांबल्या, सावळा गोंधळ, जेवन जाईना हातात मोबाईल फोन ‘मोबाईलचा नाद लै बेकार’ व्यक्तिमत्त्वाला मिळेना आकार. काढा पोरांच्या हातून फोन आणि त्यांना त्या ऐवजी ‘सा रे ग म प Li’L Champs’ दाखवा. असं एक गमतीदार भारूड सादर करत सलील कुलकर्णी आणि मृण्मयी देशपांडे हीने मोबाईल वापराविषयी संदेश देत कार्यक्रम पाहण्याचं आवाहन देखील केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *