बिग बी अन् किंग खान 17 वर्षांनी येणार एकत्र, ‘या’ चित्रपटात दिसणार

Amitabh Bachchan Shahrukh Khan : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि किंग खान शाहरूख खान (Shahrukh Khan) यांचे चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी मनेरंजनाचा खजिना असतो. तर त्यांचं एकत्र येणं म्हणजे चित्रपट रसिक आणि त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच असते. याचे अनेक उदाहरण म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन आणि किंग खान शाहरूख खान यांचे एकत्र काम केलेले अनेक चित्रपट. मोहब्बते, कभी खुशी-कभी गम, कभी अलविदा ना कहना, ब्रम्हास्त्र या सारख्या चित्रपटांचा उल्लेख करता येतो. त्या चित्रपटांना बिग बी अन् किंग खानच्या जोडीने चार चांद लावले होते. त्यानंतर आता पुन्हा बिग बी अन् किंग खान 17 वर्षांनी येणार एकत्र येणार आहेत.

बिग बी अन् किंग खान 17 वर्षांनी येणार एकत्र…

दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि शाहरुख खान Shahrukh Khan) वर्षांनंतर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. तब्बल 17 वर्षांनी हे दोन कलाकार एकत्र येणार आहेत. या दोन सुपरस्टार्स ने बॉलीवूडवर राज्य करत आजवर प्रेक्षकांच मनोरंजन केलं आहे. संपूर्ण देश या दोघांना पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.

तब्बल 17 वर्षांनी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि शाहरुख खान Shahrukh Khan) हे दोघं सोबत येऊन काहीतरी अफलातून मनोरंजक प्रोजेक्ट करणार आहे. या बद्दल काही बातम्या अद्याप बाहेर आलेल्या नाहीत परंतु लवकरच या बद्दलचे तपशील समोर येतील अस समजतंय मनोरंजन क्षेत्रासाठी ही सर्वात मोठी बातमी आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या दोघांनी यापूर्वी मोहब्बतें, कभी खुशी कभी गम आणि कभी अलविदा ना कहना यांसारख्या सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांना मोहित केलं आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनोरंजन करण्यासाठी हे दोघे सज्ज आहेत.

दरम्यान शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि नयनताराचा बहुचर्चित ‘जवान’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासून सर्वांनाच सिनेमाबद्दलची मोठी उत्सुकता लागली आहे. तर अभिनेते अमिताभ बच्चन हे नुकतेच अभिषेक बच्चनच्या घुमर या चित्रपटामध्ये दिसले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *