जंगली रमीला विरोध करण्यासाठी शाहरुख खानच्या विरोधात आंदोलन, मन्नत बाहेर तगडा पोलीस बंदोबस्त

Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या जवान या सिनेमाच्या निमित्ताने चर्चेत आहे. शाहरुखच्या जवानची सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र शाहरुखच्या घरासमोर सध्या सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ऑनलाइन जुगार जंगली रमीची (Junglee Rummy) जाहिरात करणाऱ्या शाहरुख खानच्या घराबाहेर अनटच इंडिया फाऊंडेशनच्यावतीने (Untouch India Foundation) निदर्शने करण्यात आले. गळ्यात भगवा स्कार्फ घालून आंदोलन करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सध्या ऑनलाइन जंगली रमी हे अॅप धुमाकुळ घालत आहे. या अॅपच्या माध्यमातून पैसे जिंकण्याचं आमिष दाखवलं जातं. या जुगार अॅममध्ये पैसे हरल्यानं अनेकजण आयुष्य संपवतात. त्यामुळं जंगली रमीच्या जाहिरातीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. अनटच इंडिया फाउंडेशनच्या वतीने वांद्रे पश्चिम येथील बँड स्टँड परिसरातील शाहरुख खानच्या मन्नत घराबाहेर आंदोलन करण्यात आले. शाहरुख खान, अजय देवगण आणि हृतिक रोशन यासारखे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी जंगली रमी या ऑनलाइन जुगार खेळाची जाहिरात करत आहेत.

‘मी मोदींवर टीका केली, पण मला माहित नव्हतं..’.; अजित पवारांकडून पंतप्रधान मोदीचं तोंडभरून कौतुक

शाहरुख-अजय देवगणसारख्या अभिनेत्यांना खऱ्या आयुष्यात अनेकजण हिरो मानतात. त्यामुळं अनेकजण त्यांना फॉलो करतात. त्याचं अनुकरणं करतात. अनेकांना जण या जंगली रमीत गुरफटले आहेत. ऑनलाइन जुगार अॅपमध्ये पैसे हरल्यानं अनेक तरुण जीवनही संपवतात. म्हणून अनटच इंडिया फाऊंडेशनच्या वतीने शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर आंदोलन करण्यात आले. आंदोलन सुरू असतांनाच वांद्र पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन वांद्रे पोलीस ठाण्यात नेले आहेत.

जवान हा शाहरुखचा मेगा प्रोजेक्ट आहे. याआधी किंग खानच्या ‘पठाणन’ चित्रपटाने एक हजार कोटींची कमाई करून मोठा विक्रम केला होता. केवळ भारतातच नव्हे तर जगातील विविध देशांमध्ये त्यांनं मोठी कमाई केली होती. आता चाहत्यांना जवानकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्याच्या यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *