Box Office Collection:’जेलर’ने पार केला ५०० कोटींचा टप्पा; कोण हिट कोण फ्लॉप..? जाणून घ्या…

  • Box Office Collection * : ‘गदर 2′ (Gadar 2), ‘ओएमजी 2’ (OMG 2), ‘घूमर’ (Ghoomer) आणि ‘जेलर’ (Jailer) हे सिनेमे सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार धमाका करत आहेत. एकीकडे हे सिनेमे बॉक्स ऑफिस गाजत असताना दुसरीकडे ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) आणि ‘अकेली’ (Akelli) हे सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज आहेत.

दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवा (Rajinikanth) यांची क्रेझ चाहत्यांमध्ये आज देखील कायम दिसत असते. त्यांचा ‘जेलर’ हा सिनेमा देशभरात बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत असल्याचे बघायला मिळाले आहे. प्रदर्शितच्या पहिल्या आठवड्यामध्ये या सिनेमाने २३५.८५ कोटींचा गल्ला कमावला आहे. देशात प्रदर्शितच्या १३ दिवसांत या सिनेमाने २९१.८० कोटींची कमाई केली आहे. तर ‘जेलर’ या सिनेमाने देशभरात ५१६.९ कोटींचा गल्ला कमावला आहे.

‘गदर 2’ हा सिनेमा प्रदर्शित होऊन १२ दिवस पूर्ण झाले आहेत. प्रदर्शितच्या अगोदरपासून चर्चेत असलेल्या या सिनेमाला भारतीय सिने-रसिकांनी खूपच डोक्यावर घेतलं होतं. मोठ्या वीकेंडचा या सिनेमाला जोरदार फायदा होत असल्याचे बघायला मिळालं. प्रदर्शितच्या पहिल्या आठवड्यामध्ये या सिनेमाने २८४.६३ कोटींचा गल्ला कमावला आहे. तर प्रदर्शितच्या १२ दिवसांत या सिनेमाने ४००. १० कोटींची कमाई झाली. तसेच जगभरात या सिनेमाने ५०६.६ कोटींचे एकूण कलेक्शन जमा केले आहे. सनी पाजी (Sunny Deol) या सिनेमात मुख्य भूमिकेमध्ये आहेत.

तसेच बॉलिवूडचा खिलाडी (Akshay Kumar) आणि पंकज त्रिपाठींचा ‘ओएमजी 2’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शितच्या पहिल्या आठवड्यात या सिनेमाने ८५.०५ कोटींचा गल्ला कमावला आहे. तर १२ दिवसात या सिनेमाने १२०.६२ कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाचे कथानक आणि कलाकारांच्या अभिनयाचे चाहत्यांनकडून मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहे. तर देशभरात या सिनेमाने १६३.५५ कोटींची कमाई केली आहे.

‘घूमर’ हा सिनेमा १८ ऑगस्ट २०२३ दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. प्रदर्शितच्या ५ दिवसामध्ये या सिनेमाने देशात ४.१६ कोटींचा गल्ला कमावला आहे. एकीकडे ‘गदर 2’ आणि ‘ओएमजी 2’ हे दोन सिक्केल सिनेमे बॉक्स ऑफिसवर धमाका करत असताना या सिनेमांच्या शर्यतीमध्ये आता ‘घूमर’ सिनेमाने एन्ट्री मारली आहे. परंतु प्रदर्शितच्या ५ दिवसांत हा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात थोडासा कमी पडला आहे. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *