Sharad Pawar झोपेतही ईडी म्हटल्यावर 1 किलोमीटर धावतात; मुनगंटीवारांची टीका

Sudhir Mungantiwar on Sharad Pawar : रात्री झोपेत असताना देखील ईडी म्हटलं तरी शरद पवार (Sharad Pawar) हे 1 किलोमीटर धावतात. तसेच ज्यांनी आयुष्यभर कुटुंबासाठी राजकारण केलं. त्यांनी ज्ञान शिकवू नये. भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादीत अजित पवारांनी उभी फुट पाडून भाजपसोबत घरोबा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनासाठी पुन्हा एकदा शरद पवार मैदानात उतरले आहेत. तर गुरूवारी बीडच्या स्वाभिमानी सभेत पवारांनी भाजपवर टीका केली होती. त्याला मुनगंटीवारांनी उत्तर दिले आहे.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

रात्री झोपेत असताना देखील ईडी म्हटलं तरी शरद पवार हे 1 किलोमीटर धावतात. त्यांनी तत्वज्ञान सांगू नये. ज्यांनी आयुष्यात केवळ आपल्या कुटुंबासाठीच राजरकारण केलं. तसेच त्यांनी उलथवून लावण्याची भाषा करू नये. त्यांनी अशी भाषा करावी ज्यांनी आपलं आयुष्य जनतेसाठी वेचलं आहे. असं म्हणत भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

राष्ट्रवादीतील बंडाळी नंतर शरद पवारांनी दौरे सुरू केले. आज बीडमध्ये राष्ट्रवादीची सभा झाली. त्यावेळी ते जनतेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले की, दिल्लीतील 15 ऑगस्टच्या भाषणात बोलतांना पंतप्रधान मोदींनी मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन, अशी घोषणा केली.

मात्र माझं एकच सांगण आहे की, महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते. त्यांच नाव देवेंद्र फडणवीस. त्यांनीही मी पुन्हा येईल, पुन्हा येईनची घोषणा दिली होती. त्यांनी घोषणा केली आणि ते पुन्हा आले पण, उपमुख्यमंत्री म्हणून. आता ही जी घोषणा तुम्ही केली, ती पूर्णत्वास नेण्यासाठी देवेंद्र फडणवीसाचं मार्गदर्शन घ्या, आणि पंतप्रधान पदाच्या खालील कोणत्या पदावर यायचं ते ठरवा, अशी खोचक टीका पवारांनी केली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *