Shahrukh Khan ने बॉलिवूडला उद्धवस्त केलं; विवेक अग्निहोत्रींचे गंभीर आरोप

Vivek Agnihotri on Shahrukh Khan : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या चित्रपटांमुळे त्याच बरोबर त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. यावेळी देखील त्यांनी असंच एक विधान केलं आहे. त्यांनी यावेळी बॉलिवू़ड अभिनेता शाहरूख खानवर टीका केली आहे. त्यांनी शाहरूखवर गंभीर आरोप केले आहेत. एका मुलाखती दरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी ही टीका केली आहे.

अग्निहोत्रींचा शाहरूखवर गंभीर आरोप…

एका मुलाखती दरम्यान टीका करताना अग्निहोत्री म्हणाले की, शाहरूख खानचं राजकारण मला आवडत नाही. त्याने बॉलिवूडला केवळ पीआर, हाईप, ग्लॅमर आणि स्टारडम अशी ओळख दिली आहे. त्याने बॉलिवूडला बर्बाद केले आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना अग्निहोत्रीं आपण शाहरूखचे चाहते आहोत. मला इतर कोणीही त्याच्यासारखं आहे. असं वाटत नाही. असं म्हटलं मात्र त्यांनी त्याच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत.

शाहरूखला वाटत प्रेक्षक मुर्ख आहे. त्याचे चित्रपट लोकांचे नसतात. मला असं लोकांना मुर्ख ठरवणं आवडत नाही. मी लोकांसाठी चित्रपट बनवतो. तर शाहरूख हा बॉक्स ऑफिससाठीचे चित्रपट बनवतो. तर जेव्हा त्याचा चित्रपट यशस्वी होतो. तेव्हा तो शाहरूखचा चित्रपट यशस्वी होत असतो. मात्र माझा चित्रपटाचं यश हे लोकांचं यश असतं. अशा शब्दांत अग्निहोत्रींनी शाहरूखवर टीकास्त्र सोडलं आहे.

शाहरूख आणि मी विवेक अग्निहोत्री हे दोन टोक आहेत. एक उत्तर आणि एक दक्षिण पण त्याच्यावर प्रेम करतो. आमचं नात शक्ति आणि दीवार प्रमाणे आहे. त्यामध्ये ज्याप्रमाणे वडिल आणि भाऊ दोघांवर प्रेम केलं जात. मात्र एक पोलीस आणि एक स्मगलर असतो. त्यामुळे तुम्हाला आमच्या दोघांमध्ये कोण पोलीस आहे? आणि कोण स्मगलर आहे? हे ठरवायचं आहे. असं म्हणत विवेक अग्निहोत्री शाहरूखवर गंभीर आरोप केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *