‘मी मुल्ला उद्धव ठाकरे झालोयं अन् राजकीय धर्मांतरही..,’; नितेश राणेंची जळजळीत टीका

मी मुल्ला उद्धव ठाकरे झालोयं अन् माझं राजकीय धर्मांतरही झालंय, हे सांगण्याची हिंमत ठेवा अशी जळजळीत टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. नूकतीच मातोश्रीवर काँग्रेसच्या नेत्यांची आणि ठाकरे गटाची बैठक पार पडली. या बैठकीवरुन नितेश राणेंनी टोलेबाजी केली आहे.

नितेश राणे म्हणाले, हिंदुत्वाचा आवाज म्हणून मातोश्रीकडे पाहिलं जायचं, प्रत्येकजण हिंदुत्वाचं केंद्रबिंदू म्हणून मातोश्रीला म्हणायचा पण आता तिथेच तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठका घेतात, कडवट शिवसैनिक तिथं आले तर तुम्ही गौमूत्र शिंपडता. आता काँग्रेसचे लोकं तिथं आले तुम्ही आता गौमुत्र शिंपडणार का? नाहीतर मी मुल्ला उद्धव ठाकरे झालोयं माझं राजकीय धर्मांतर झालंय असं सांगण्याची तरी हिम्मत ठेवा असं नितेश राणे म्हणाले आहेत.

तसेच एकीकडे हिंदुत्वाची भाषा करायची अन् हिंदुवर अत्याचार करणाऱ्या काँग्रेस नेत्यांसोबत बैठक घेतात. आता उद्धव ठाकरेंनी आपण सेक्युलर झालो असल्याचा खुलासा करावा. संजय राऊत नशेत बोलतात, त्यांना माहीत आहे, आज ना उद्या त्यांना सुजित पाटकरांसोबत तुरुंगात जावे लागेल, म्हणूनच ते पंतप्रधानांवर बोलत असल्याचं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, एकीकडे भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांचा बैठकांवर जोर आहे. असं असतानाच नितेश राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे भाजप ठाकरेंसोबत येण्यास तयार असल्याचं राणे म्हणाले आहेत. राणे यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर आता ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर देण्यात येणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *