Thank You For Comingची नवी इनिंग; अनिल कपूरची लेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

  • Thank You For Coming Movie* : रिया कपूरच्या आगामी प्रोजेक्ट, “थँक यू फॉर कमिंग” (Thank You For Coming Movie ) ने सिनेमॅटिक क्षेत्रात तुफान झेप घेतली आहे. ज्यामुळे रिया कपूरच्या (Rhea Kapoor) निर्मात्याच्या प्रवासात अजून भर पडली आहे. सिनेमाच्या जगात रेकॉर्डसह अनिल कपूरच्या (Anil Kapoor) निर्मितीमध्ये धाडसी पाऊल घेऊन त्यांनी विविध प्रोजेक्ट्स केले आहेत. विशेषत: रिया कपूर आणि अनिल कपूर यांनी एकत्रित येऊन नेहमीच वेगळ्या विषयावर चित्रपट केले आहेत.

अनिल कपूरने रिया कपूर आणि एकता कपूर (Ekta Kapoor) यांच्या सोबत या नवीन सहकार्याची घोषणा करण्यासाठी इंस्टाग्रामवर (Instagram) चित्रपटाचे पोस्टर शेयर केले. रियाला तिचा नवरा करण बुलानी सोबत तिच्या निवडींसह चित्रपट उद्योगात एक अनोखा मार्ग तयार करताना पाहून त्याने प्रचंड अभिमान व्यक्त केला.

‘थँक्स फॉर कमिंग’चे पोस्टर प्रदर्शित : दरम्यान या चित्रपटाची निर्मिती अनिल कपूरचे प्रोडक्शन हाऊस अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्क करत आहे. करण बलुनी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणार असल्याचे बोलले जात आहे. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरवर खूप कमेंट्स येत आहे. आता या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये आहे तरी कोण हे जाणून घेण्यासाठी चाहते, या चित्रपटाच्या निर्मात्यांना काही प्रश्न विचारत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये शहनाज आहे की भूमी पेडणेकर यामध्ये सध्या कन्फ्यूजन आहे. दरम्यान बरेच वापरकर्ते या फोटोवर अश्लील कमेंट्स देखील करत आहेत. आता या चित्रपटाबाबत प्रेक्षक खूप आतुर आहेत.

भूमी पेडणेकर आणि शहनाज गिलचे वर्कफ्रंट : भूमी पेडणेकरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती, नुकतीच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत सुधीर मिश्रा यांच्या ‘अफवाह’ चित्रपटात दिसली होती. पुढे ती ‘तख्त’ आणि ‘भक्षक’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. दरम्यान शहनाज गिलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर शेवटी ती ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटामध्ये सलमान खानसोबत झळकली होती. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत पलक तिवारी, राघव जुयाल, पुजा हेगडे देखील होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. शहनाज हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर ती कुठल्याच चित्रपटामध्ये झळकली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *