Box Collection: ‘गदर २’ची पाचव्या दिवशी घोडदौड सुरुच; लवकरच मोडणार ‘द केरला स्टोरी’चा रेकॉर्ड!

  • Gadar 2 Box Office Collection* : सध्या थेटरमध्ये ‘गदर २’ (Gadar 2) या सिनेमाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. सनी पाजी (Sunny Deol) आणि अमीषा पटेलचा (Ameesha Patel) हा सिनेमा ११ ऑगस्ट दिवशी प्रदर्शित झाल्यापासून रेकॉर्डब्रेक तोडत कमाई करत असल्याचे बघायला मिळत आहे. या सिनेमाने कमाईच्या बाबतीत ‘बाहुबली’चा (Bahubali) देखील रेकॉर्ड मोडला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी ‘गदर २’ ने जवळपास ८३ कोटींचा गल्ला कमावला.

‘गदर २’ चे शो सध्या हाऊसफुल्ल (Housefull) होत असल्याचे बघायला मिळत आहे. सिनेमाला चाहत्यांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. तिसऱ्या दिवशी ‘गदर २’ ने सर्वाधिक ५० कोटींचा गल्ला जमवला, आणि अवघ्या ३ दिवसामध्ये या सिनेमाने १३३.१८ कोटींची मोठी कमाई करत एक अनोखा रेकॉर्ड केला आहे. यानंतर आलेल्या लॉन्ग वीकेंडमुळे तर सिनेमाच्या कमाईमध्ये अजून भर पडल्याचे स्पष्ट होत आहे.

१५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनानिमित्त या ‘गदर २’साठी चाहत्यांनी बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे बघायला मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘गदर २’ने १५ ऑगस्टला ५५ कोटींचा गल्ला कमावला आहे. ‘गदर २’च्या कमाईमध्ये आजवरचा हा पहिल्या दिवसाचा सर्वाधिक आकडा असल्याचे मानले जात आहे. तसेच ५ दिवसांत ‘गदर २’ने २२९ कोटींच्या आसपास कमाई देशातमध्ये झाली आहे. तसेच लवकरच हा सिनेमा ‘द केरला स्टोरी’चा अन् किंग खानच्या ‘पठाण’ला देखील मागे टाकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सनी पाजीचा ‘गदर २’ हा सिनेमा त्याच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित या सिनेमात त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्माची देखील मुख्य भूमिका दिसून आली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अनिल शर्मा यांनी पुन्हा उत्कर्षला सिनेमामध्ये नाव कमावण्याची संधी देण्यात आली आहे. २२ वर्षांअगोदर आलेल्या ‘गदर एक प्रेम कथा’ या सिनेमाने देखील बॉक्स ऑफिसवर ७६.६५ कोटींची रेकॉर्ड ब्रेक कमाई केल्याचे बघायला मिळाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *