घराणेशाही सगळ्याच पक्षात; अमित शाहांचेच शब्द ऐकवत सुळेंचे मोदींना तिखट प्रत्युत्तर

Supriya Sule : स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाच्या विरोधी पक्षांच्या राजकारणावर घणाघाती टीका केली. आता त्यांच्या या टीकेवर विरोधी पक्षांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी यांनी घराणेशाहीवर केलेल्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले.

सुळे यांनी आज पीटीआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या. भ्रष्टाचार आणि घराणेशाही सगळ्याच पक्षात आहे. अमित शाह लोकसभेत म्हणाले होते की जेव्हा तुम्ही एखाद्याला बोट दाखवत, तेव्हा स्वतःचीच 3 बोटं आपल्याकडे वळलेली असतात. त्यांनी या वक्तव्याद्वारे एक प्रकारे भाजपातही घराणेशाही असल्याचे अधोरेखित केले.

नवाब मलिक कोणत्या गटात जाणार? भुजबळांच्या उत्तराने वाढला सस्पेन्स

मोदी काय म्हणाले होते ?

मोदी यांनी आपल्या भाषणात विरोधी पक्षांच्या राजकारणावर जोरदार प्रहार केला. भ्रष्टाचार हा देशातील सर्व समस्यांचे मूळ आहे. एखाद्या वाळवीप्रमाणे देशाचे सामर्थ्य या भ्रष्टाचाराने पोखरले आहे. त्याला हद्दपार करण्यासाठी आपल्याला सर्वच क्षेत्रात त्याच्याशी दोन हात करावे लागतील. देशाला घराणेशाहीने पोखरले आहे. घराणेशाहीने जखडून ठेवले असून जनतेचे अधिकारही हिरावून घेतले आहेत. याशिवाय द्वेषभावनेने देशाच्या सर्वसमावेशक चारित्र्याला डाग लावला आहे.

मी भ्रष्टाचाराविरोधात लढत राहणार. दुसरी गोष्ट म्हणजे परिवारवादाने देशाचे मोठे नुकसान केले. देशाला एक प्रकारे जखडून ठेवले आहे. देशातील लोकांचा हक्क हिरावला गेला. तुष्टीकरणाच्या राजकारणाने देशाच्या मुलभूत चिंतनाला, चरित्राला डाग लावला आहे. या तीन गोष्टींविरोधात लढायचे आहे. हीच मोदींची कमिटमेंट आहे.

भारत आता 6G साठीही तयार

टेक्नॉलॉजी क्षेत्रात भारत वेगाने प्रगती करत आहे. मागील वर्षात आपण 5G सुरू करण्यात आले होते. आता आपला देश 6G साठी देखील तयार आहे. यावर्षातील मार्च महिन्यातच 6G व्हिजन डॉक्यूमेंट लाँच करण्यात आले होते. यासोबत 6G रिसर्च अँड डेव्हलपमेंट टेस्ट बँड लाँच केलं होतं. या डॉक्युमेंट्सचा नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी फायदा होणार असल्याचे मोदी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *