Box Office Collection: सनी पाजीच्या ‘गदर २’चा बॉक्स ऑफिसवर जलवा! तीन दिवसात केली एवढी कमाई

  • Gadar 2 Box Office Collection Day 3* : बॉलिवूड अभिनेता सनी पाजीचा (Sunny Deol) बहुचर्चित ‘गदर 2’ (Gadar 2) हा चित्रपट आता चाहत्यांच्या भेटीला आला आहे. गेल्या काही वर्षांपासून चाहते प्रतीक्षा करत असलेला हा चित्रपट अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्याने हा चित्रपट  बघण्यासाठी चाहत्यांची पाऊले आता चित्रपटगृहाकडे वळत असल्याचे बघायला मिळत आहे. ‘गदर 2’ या चित्रपटात सनी देओल, अमिषा पटेल (Ameesha Patel) आणि उत्कर्ष शर्मा महत्वाच्या भूमिकेत दिसून आले आहेत.

‘गदर 2’ हा सिनेमा २०२३ मधला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला जाणार असल्याची चर्चा होत आहे. २००१ मध्ये ‘गदर : एक प्रेम कथा’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला होता. आता तब्ब्ल २२ वर्षांनंतर या सिनेमाचा दुसरा भाग चाहत्यांच्या भेटीला आला आहे. ‘गदर’मध्ये तारा सिंह आणि सकीनाची गोष्ट चाहत्यांना बघायला मिळाली होती. आता ‘गदर 2’मध्ये त्यांच्या मुलाला केंद्रीत करण्यात आले आहे.

‘गदर 2’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ४०.१ कोटींची मोठी कमाई केली होती. पुढे वीकेंडला या चित्रपटच्या कमाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. दुसऱ्या दिवशी ४३.०८ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ५२ कोटींची मोठी कमाई चित्रपटाने केली. अशाप्रकारे प्रदर्शितच्या ३ दिवसांत या चित्रपटाने १३५.१८ कोटींचा गल्ला कमावला आहे. आता १५ ऑगस्टला या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘गदर 2’च्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या दिवशी या चित्रपटाने ४०.१० कोटींचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ४३ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने एकूण ८३ कोटींची कमाई केली आहे. ५ दिवसांच्या दीर्घ वीकेंडमध्ये चित्रपट १७५कोटींचा टप्पा ओलांडू शकतो.

चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर सनी देओल, अमिषा पटेल यांच्याशिवाय उत्कर्ष शर्मा चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर’ हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ‘गदर’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी ‘गदर 2’ चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. या चित्रपटाची टक्कर अक्षय कुमारच्या ‘OMG 2’शी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *