Box Office Collection: ‘ओएमजी-2’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; आतापर्यंत कमावले ‘इतके’ कोटी

  • OMG 2 Box Office Collection Day 3* : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड सिनेमाना चाहत्यांची मोठी पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणारे सिनेमा सध्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. हे सिनेमा बघण्यासाठी चाहते सिनेमागृहात गर्दी करत असल्याचे बघायला मिळत आहे. ११ ऑगस्ट दिवशी प्रदर्शित झालेल्या खिलाडीच्या (Akshay Kumar) OMG 2 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

खिलाडीच्या (Khiladi) ओएमजी-2 या सिनेमाने प्रदर्शित झाल्यावर पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी १० कोटींची कमाई केली. नंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी या सिनेमाने १५ कोटींची मोठी कमाई केली. आता तिसऱ्या दिवशी या सिनेमाची कमाई १८ कोटींवर पोहोचली आहे. पहिल्या २ दिवसांच्या तुलनेमध्ये  रविवारी सिनेमाच्या कलेक्शनमध्ये १५ टक्के वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

‘ओएमजी-2’ या सिनेमाची सनी पाजीच्या ‘गदर-2’ या सिनेमासोबत बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर पाहायला मिळत आहे. हे दोन्ही सिनेमा १५ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. ‘OMG 2’ हा एक कॉमेडी-ड्रामा सिनेमा आहे. यामध्ये खिलाडी म्हणजेच चाहत्यांचा लाडका अक्षय कुमार, यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या सिनेमात पंकज त्रिपाठी यांनी कांती शरण मुद्गल यांची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर अनेक चाहते या सिनेमाचा रिव्ह्यू शेअर करुन या सिनेमाचे  कौतुक करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

‘ओएमजी-2’ हा सिनेमा २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या खिलाडीच्या ‘ओएमजी’ या सिनेमाचा सिक्वेल आहे. ओएमजी या सिनेमाला देखील चाहत्यांची  मोठी पसंती मिळाली होती. परंतु आता ओएमजी-2 या सिनेमाने देखील अनेक जण सोशल मीडियावर कौतुक करत असल्याचे बघायला मिळत आहे. गेला काही दिवसापासून या सिनेमाचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या टीझर आणि ट्रेलरला देखील चाहत्यांची मोठी पसंती मिळाल्याचं बघितलं होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *