Ameya Khopkar: ‘पाकिस्तानी सीमा हैदरच्या मुद्द्यावरुन मनसेकडून पुन्हा खळ्ळखट्याकचा इशारा!

  • Ameya Khopkar* : पाकिस्तानमधून भारतामध्ये आलेली सीमा हैदर (Seema Haider) हिची सध्या जोरदार चर्चा सुरु असल्याचे बघायला मिळत  आहे. एवढेच नाहीतर तिला एका सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून देखील भूमिकाही ऑफर देण्यात आली आहे. मेरठच्या अमित जानी (Amit Jani) यांनी तिला एका सिनेमाची ऑफर दिली आहे. तर दुसरीकडे सीमा हैदरवर ती पाकिस्तानी (Pakistani) जासूस असल्याची शंका देशातील सरकारला आहे.

सीमा हैदर ही देखील अभिनेत्री होण्यासाठी सज्ज झाली आहे. परंतु सरकारने तिला क्लीनचीट द्यावी अशी तिने मागणी यावेळी केली आहे. यावर आता (MNS) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी १२ ऑगस्टला एक ट्वीट केले होते. सध्या त्यांचे ते ट्विट सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. 

  • अमेय खोपकर यांचं ट्वीट-

  • पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकलं नाही तर राडा तर होणारच..!!

आता मनसेच्या इशाऱ्यानंतर निर्माते माघार घेणार का? हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. अमित जानी यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये सीमा हैदर ‘कराची टू नोएडा’ सिनेमासाठी ऑडिशन देत असल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु हे सर्व नाटक बंद करण्याचा पुन्हा एकदा खळ्ळखट्याकचा इशारा मनसेने दिला आहे. जर हे थांबलं नाही तर धडक कारवाई होईल असा थेट इशारा मनसेचे अमेय खोपकर यांनी दिल्याचे बघायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *