स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार देशाला संबोधित

President Draupadi Murmu Adress Nation : उद्या 15 ऑगस्टला देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिन आहे. त्यानिमित्त देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार आहेत. आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला त्या देशाला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपती भवनाकडून सांगण्यात आले आहे की, आज 14 ऑगस्टला सायंकाळी 7 वाजता संबोधित करणार आहेत. (President Draupadi Murmu Adress Nation on The Ocasion Of Independace day )

हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओच्या संपूर्ण राष्ट्रीय नेटवर्कवर आणि सर्व दूरदर्शन वाहिन्यांवर हिंदी आणि नंतर इंग्रजीमध्ये प्रसारित केले जाणार आहे. त्यानंतर रात्री 9030 वाजता हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओच्या प्रादेशिक भाषांमध्ये देखील दाखवण्यात येणार आहे. असे राष्ट्रपती भवनाकडून सांगण्यात आले आहे.

त्याचबरोबर उद्या 15 ऑगस्टला देशाच्या 77 वा स्वातंत्र्य दिनी देशाचे पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. उद्या एतिहासिक लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर देशाचे पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार आहेत.

यावर्षीच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यामध्ये 1800 विशेष पाहुणे सहभागी होणार आहेत. यामध्ये 400 हून अधिक गावांचे सरपंचाचा समावेश आहे. यासाठी 12 वेगवेगळ्या ठिकाणी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *