‘ठाकरे गटाचं अस्तित्व संपलं अन् राऊत पवारांची स्क्रिप्ट वाचतात’; शिंदे गटाच्या आमदाराने धू-धू धुतलं…

मागील काही दिवसांपासून शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गट समोर उभा ठाकलेला आहे. दोन्ही गटातील नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठांनी खोचक टीका केली आहे. ठाकरे गटाचं अस्तित्व तर संपलचं, पण संजय राऊत शरद पवारांनी दिलेली स्क्रिप्ट बोलत असल्याचं शिरसाठ म्हणाले आहेत.

पुढे बोलताना शिरसाठ म्हणाले, राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे. जे लोकं आमच्या विरोधात बोलताहेत, गद्दार म्हणताहेत तेच आमच्या दारात उभं राहणार असल्याचं शिरसाठ म्हणाले आहेत. तसेच आगामी निवडणुकीत आम्ही बहुमताने निवडून येणार असल्याने विरोधकांना चिंता लागली असल्याचं म्हणत त्यांनी चिमटा काढला आहे.

यावेळी बोलताना शिरसाठ यांनी संजय राऊतांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत शरद पवारांनी दिलेली स्क्रिप्टच्या आधारे बोलत असतात. संजय राऊत उगीचच बोलत नाहीत, त्यांना शरद पवारांनी स्क्रिप्ट दिलेली आहे, त्यामुळेच ते बोलत असल्याचं म्हणत त्यांनी राऊतांना डिवचलं आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबतच आहोत, आता उद्धव ठाकरे गटाचं अस्तित्व संपलं असल्याचीही टीका त्यांनी केलीयं.

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार राजीनाम्यासाठी तयार असतील तर ते उद्धव ठाकरे गटाला भारी पडतील, तसं काही असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची दखल घेतली पण काहीही झालं तरीही आम्ही उद्धव ठाकरे गटासोबत जाणार नसल्याचं आमदारांनी ठामपणे सांगितल्याचं शिरसाठ यांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *