अभिनेत्री तमन्ना भाटिया ‘इंडिया डे परेड’मध्ये ग्रॅंड मार्शल म्हणून चमकली!

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. आताही तमन्ना भाटिया न्यू जर्सीमधील 19 व्या परेडमध्ये ग्रॅंड मार्शल म्हणून चमकली आहे. ही भारतासाठीही अभिमानाची बाब असून यंदाच्या ‘इंडिया डे परेड’मध्ये ग्रॅंड मार्शल म्हणून तमन्नाने नेतृत्व केलं आहे. त्यामुळे भारतीय अभिनेत्री न्यू जर्सीच्या परेडमध्ये चमकल्याने तमन्नाची सर्वत्र जोरदार सुरु आहे.

तमन्ना भाटिया सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. तमन्नाने जगभरातील अनेक भाषांमध्ये वैविध्यपूर्ण फिल्मोग्राफीद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सिनेसृष्टीतील रसिकांमध्ये ती एक प्रिय अभिनेत्री बनली आहे. तमन्ना ‘जी कारदा’, लस्ट स्टोरीज2, जेलर, भोला शंकर या आगामी प्रोजेक्टसाठी चर्चेचा विषय ठरलेली आहे. तमन्नाची सिनेसृष्टीतल्या प्रवासाची दखल घेत इंडिया डे परेडसाठी निवड करण्यात आली आहे.

परडेमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा अधोरेखित करण्यात आली असून या कार्यक्रमात रंग, संगीत, नृत्य सादर करण्यात आलं होतं. कार्यक्रमात तमन्नाची भूमिका भारतीय संस्कृतीला जोडण्यासाठी, एकात्मतेला प्रोत्साहन देण्यासाठी होती. या कार्यक्रमात तमन्नाच्या चाहत्यांमध्ये भर पडल्याचंही समोर आलं आहे.

दरम्यान, तमन्ना भाटियाने तमिळ, हिंदी, चित्रपटांसह अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारुन सिने विश्वात आपले लाखो चाहते तयार केलेले आहेत. यामध्ये विशेषत: मल्याळम, तमिळसह इतर हिंदी चित्रपटांचाही समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *