‘NDA’त असंतोषाची ठिणगी! मणिपूरवर बोलू दिलं नाही; मित्रपक्षाचा खासदार भडकला

Manipur Violence : मणिपुरातील हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारवर घणाघाती टीका सुरुच ठेवली आहे. कोंडी करण्यासाठी संसदेत अविश्वास प्रस्तावही आणला होता. हा अविश्वास प्रस्ताव सरकारने जिंकला असला तरी या मुद्द्यावर मोदी सरकारची कोंडी होताना दिसत आहे. फक्त विरोधकच नाही तर एनडीए आघाडीतील घटकपक्षही सरकारच्या कारभारावर नाराज दिसत आहे. या असंतोषाची ठिणगी ईशान्य भारतातीलच मित्रपक्षाने टाकली आहे. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीचा घटक पक्ष असलेला नागा पीपल्स फ्रंट या मित्रपक्षाच्या खासदारानेच भाजपवर आगपाखड केली आहे. लोरहो पफोज असे या खासदाराचे नाव आहे.

आम्हाला मणिपूरबाबत आमचे मत संसदेत मांडायचे होते. पण आम्हाला परवानगीच मिळाली नाही. आम्ही भाजपचे मित्र पक्ष असलो तरी आम्हाला आमच्या लोकांचा आवाज संसदेत उठवायचा होता असे खासदार पफोज म्हणाले. ते पुढे म्हणाले, आमचे हात बांधलेले आहेत. आम्ही भाजपचे मित्र आहोत त्यामुळे आम्हाला काही आदेशांचे पालन करावे लागते. भाजपने मणिपूरमध्ये खूप काम केले आहे अगदी डोंगराळ भागातही पण, अलीकडे हा मुद्दा ज्या पद्धतीने हाताळला गेला ते चुकीचे होते, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस नेते राहुल गांधी मणिपुरात आले. इथल्या हिंसाचारग्रस्त लोकांची त्यांनी भेट घेतली. हे पाहून मी प्रभावित झालो. पंतप्रधान अजूनही मणिपूरच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत म्हणून आम्ही नाराज आहोत. मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना ज्या पद्धतीने केंद्र सरकारने वाचवल त्यावर मी नाराज आहे, अशा शब्दांत खासदार पफोज यांनी केंद्र सरकारच्या कारभाारवर नाराजी व्यक्त केली.

मोदींना मणिपूर घटनेचे गांभीर्यच नाही – राहुल गांधी

राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषदेत पीएम मोदींवर घणाघाती टीका केली. खरंतर काल मोदींजींनी केलेलं भाषण हे भारताविषयी, इथल्या प्रश्नांविषयी नव्हतचं. त्यांचं भाषण हे फक्त नरेंद्र मोदी या विषया भोवती होतं. ते आपली महत्वकांक्षा, राजनीती यावर बोलत होते. आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, असं सांगित राहिले. प्रश्न हा नाही की ते पंतप्रधान होतील की नाही हा नाही. तर मुद्दा असा आहे की, मणिपूर जळतं, तिथल्या महिलांवर अमानुष अत्याचार होत आहेत. मात्र, मोदींनी या प्रश्नांना बगल दिली. काल मोदी जे बोलले, ते त्यांनी संसदेत नाही, जाहिर भाषणात बोलायला हवं. त्यांना भानच राहिलं नाही की, चर्चा त्यांच्याविषय़ी नाही तर मणिपूरविषयी सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *