Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘बाजी’ कोण मारणार, सनी पाजी की खिलाडी? जाणून घ्या कलेक्शन

Gadar 2 OMG 2 Box Office Collection* : बॉलिवूड अभिनेता सनी पाजीचा (Sunny Deol) ‘गदर 2’ (Gadar 2) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. परंतु त्याच दरम्यान अक्षय कुमारचा (Akshay Kumar) म्हणजेच खिलाडीचा ‘ओएमजी 2’ (OMG 2) हा सिनेमा देखील प्रदर्शित झाला आहे. यामुळे बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही सिनेमे आता आमने-सामने पाहायला मिळत आहे.

‘गदर 2’ आणि ‘ओएमजी 2’ या दोन्ही सिनेमांची चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. आता हे दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने चाहत्यांची गर्दी सिनेमागृहामध्ये दिसत आहे. या दोन्ही सिनेमांचा सध्या प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असला तरी कमाईच्या विषयी ‘गदर 2’ने उत्तम गल्ला कमावला आहे.

‘गदर 2’, अन् ‘ओएमजी 2’ बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या…

सनी पाजी Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Ameesha Patel) स्टारर ‘गदर 2’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्यामप दिवशी उत्तम कमाई केल्याचे पाहायला मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘गदर 2’ या सिनेमाने प्रदर्शितच्या पहिल्या दिवशी ३५ कोटींचा गल्ला कमावला आहे. तर दुसरीकडे खिलाडीच्या ‘ओएमजी 2’ने पहिल्या दिवशी फक्त १० कोटींची कमाई केल्याचे पाहायला मिळत आहे.

‘गदर 2’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अनिल शर्माने यांनी सांभाळली आहे. तर या सिनेमामध्ये सनी पाजी, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ‘गदर 2’मधील तारा सिंह आणि सकिनाची जोडी चाहत्यांच्या चांगलच पसंतीला उतरली आहे. तसेच ‘ओएमजी 2’ या सिनेमाच्या कथानकाचे कौतुक सर्वत्र ऐकायला आणि पाहायला मिळत आहे. दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर सध्या जोरदार धुमाकूळ घालत आहेत. वीकेंडला हे सिनेमे आणखी कमाई करणार, असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सनी पाजी आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर’ हा सिनेमा २००१ मध्ये चाहत्यांच्या भेटीला आला होता. आता तब्ब्ल २२ वर्षांनंतर या सिनेमाचा दुसरा भाग चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. ‘गदर 2’चं कथानक तारा सिंह आणि त्याचा मुलगा चरणजीत यांच्याभोवती फिरणारं आहे. तर दुसरीकडे खिलाडी कुमारच्या ‘ओएमजी 2’ सिनेमाचं कथानक शिवभक्त कांती शरण मुदगल म्हणजे पंकज त्रिपाठीभोवती फिरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

‘ओह माय गॉड 2’ हा सिनेमाला सर्टिफिकेट देण्यास बोर्डाने अगोदर नकार दिला होता. परंतु नंतर कमिटीने निर्मात्यांनी २० कट्सला कात्री लावली होती. तसेच लैंगिक शिक्षणाचा मुद्दा आल्याने आणि सिनेमामधील काही दृश्यांमुळे ‘ओह माय गॉड 2’ या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने A सर्टिफिकेट म्हणजेच अडल्ट सर्टिफिकेट देण्यात आले होते. यामुळे आता हा सिनेमा फक्त प्रौढांनाच बघता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *