विधानसभेत 135 जिंकल्या, लोकसभेत किती? मुख्यमंत्र्यांनी थेट आकडाच सांगितला

Karnataka Politics : दक्षिण भारतातील एकमेव राज्यही भाजपाच्या हातातून काँग्रेसने काढून घेतले. सत्तेत येण्यासाठी येथील नागरिकांना जी आश्वासने दिली होती ती पूर्ण करण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकांचीही तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यातील 135 जागा जिंकल्या आहेत. आता लोकसभा निवडणुकीत किमान 20 जागा जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला.

अथणी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भविष्यवाणी केली. आगामी लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवण्याच्या दृष्टीने पक्षाकडून नियोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या सरकारवर लादेनचे सरकार असल्याचा जो आरोप होत आहे त्यावरही सिद्धरामय्या यांनी उत्तर दिले. सध्याचे सरकार लादेनचे सरकार असल्याची टीका माजी मंत्री आर. अशोक यांनी केली होती. त्यांना लोकसभा निवडणूक हरण्याची भीती वाटत आहे म्हणून ते हतबल झाले आहेत, असा पलटवार सिद्धरामय्या यांनी केला.

पोलिसांनी एका दिव्यांग व्यक्तीला मारहाण केल्याचा मुद्दाही चांगलाच चर्चेत आहे. यावरही त्यांनी भाष्य केले. पोलिसांनी त्या व्यक्तीला केलेल्या मारहाणीचे समर्थन करणार नाही. पोलिसांनी जे केले ते चुकीचेच होते. मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित केले असून त्याची विभागीय चौकशी केली जाईल. गैरप्रकार करणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जात असल्याचे सिद्धरामय्या म्हणाले.

कर्नाटकात भाजपला दुहेरी धक्का

कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव करत सत्ता स्थापन केली. कर्नाटकातील भाजपचा हा पराभव भाजपसाठी आगामी लोकसभेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर आता काँग्रेसने सत्तेत आल्यानंतर भाजपवर पहिला वार केला आहे. कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. यात भाजप सरकारच्या काळात आणलेला धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. एवढेच नव्हे तर, के.बी.हेडगेवार यांच्याशी संबंधित धडा कर्नाटकातील शाळांच्या अभ्यासक्रमातून वगळण्याच्या निर्णयालाही मान्यता देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *