रोहित शर्माची आशिया चषकापूर्वी जोरदार तयारी सुरु; जिममधील व्हिडिओ व्हायरल

Rohit Sharma Video : इंडियन क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा सध्या एकही सामना खेळताना पाहायला मिळत नाही. कारण कर्णधार 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कपच्या तयारीत व्यस्त आहे. रोहित शर्माने स्पर्धेपूर्वी जिममध्ये भरपूर घाम गाळल्याचे पाहायला मिळत आहे. आशिया कपसाठी रोहित शर्माने जोरदार तयारी सुरु केली आहे. गेल्या आशिया चषकात भारताला सुपर-4 टप्प्यातून बाहेर पडावे लागले होते, मात्र यावेळी टीम इंडियाला आणखी एक आशिया चषक विजेतेपद मिळवायचे आहे.

रोहित शर्माच्या या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळाली आहे. काही तासांपूर्वी शेअर केलेल्या व्हिडिओला पाच लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. याशिवाय चाहत्यांनी व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. एका युजरने रोहित शर्माला महान कर्णधार असे म्हटले आहे.

याशिवाय आणखी एका युजरने रोहित शर्माला सध्याच्या पिढीतील सर्वोत्कृष्ट सलामीवीर असल्याचे सांगितले. तर एका यूजरने लिहिले की, कॅप्टन, आशिया कप आणि वर्ल्ड कप जिंका. रोहित शर्माच्या पोस्टवर चाहत्यांनी अशाच प्रतिक्रिया दिल्या आहेत.

30 ऑगस्टपासून आशिया कप 2023 सुरु होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यातून कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि अनेक स्टार खेळाडू टीम इंडियात पुनरागमन करणार आहेत. टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिका खेळत आहे. भारतीय संघ टी-20 मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *