टीम इंडियाला वेस्ट इंडिजशी बरोबरी करण्याची संधी; चौथ्या टी-२० सामन्याचा आज अमेरिकेत थरार

टीम इंडियाचा टी20 मालिकेतला चौथा सामना आज अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथल्या लॉडरहिल मैदानात खेळवण्यात येणार आहे. आधीच्या 3 सामन्यांपैकी सलग 2 सामन्यात वेस्ट इंडिजने टीम इंडियावर विजय मिळवत 2-0 अशी आघाडी घेतली, तर टीम इंडियाने तिसरा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन केलं आहे. आता टीम इंडियाला चौथ्या सामन्यात मालिकेत बरोबरी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरावं लागणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील आजच्या चौथ्या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी लॉडरहिल मैदानात 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार. हे खेळाडू खेळणार आहेत.

दरम्यान, टी 20 सिरीजमधील हा चौथा सामना भारताने जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजचा पत्ता कट होणार आहे. तर टीम इंडियाला सामना जिंकल्यास मालिकेत बरोबरी करण्याची संधी आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी चौथा सामना हा अटीतचटीचा ठरणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी कर्णधार हार्दिक पंड्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करणार असल्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *