Yaariyan 2 Poster: प्रेक्षकांच्या भेटीला येतोय नव्या कलाकारांसह ‘यारियां’चा सिक्वल

  • Yaariyan 2 Poster* : २०१४ मध्ये गाजलेला यारिया (Yaariyan) या सिनेमाचा सिक्वल लवकरच आता चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात हिमांश कोहली, रकुल प्रित सिंग यांच्या प्रमुख भूमिका होत्या. परंतु आता सिक्वलमध्ये तेच कलाकार दिसणार नाहीत. सिक्वलमध्ये दिव्या खोसला कुमार, पर्ल व्ही पुरी आणि अभिनेता मिजान जाफरी यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहेत. जवळपास आता ८ वर्षानंतर या सिनेमाचा सिक्वल प्रदर्शित करण्यात येणार आहे.

यारिया सिनेमाने चाहत्यांच्या मनामध्ये अनोखे स्थान निर्माण केले होते. पर्ल व्ही पुरी याअगोदर दिव्याबरोबर एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम केल्याचे पाहायला मिळाले आहे. दिव्या आणि तिची बॉन्डिंग खूप रंजक आहे. या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. यामध्ये दिव्या ही नवरीच्या लूकमध्ये असल्याचे बघायला मिळत आहे. तसेच तिने अभिनेत्यांच्या खांद्यावर हात ठेवले आहेत. ती सिगारेट ओढत असलयाचे दिसत आहे तर दुसरीकडे पर्ल व्ही पुरी मीझानकडे रागाने बघत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दिव्या खोसला कुमारने तिच्या इंस्टाग्रामवर (Instagram) नुकतेच ‘यारियां 2’ चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. तसेच हे पोस्टर शेअर करत असताना त्याने कॅप्शनमध्ये सांगितले आहे की, ‘माझ्या आईच्या आशीर्वादाने मी माझ्या यारियां 2 या सिनेमाचे पोस्टर सर्वांसोबत शेअर करत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राधिका राव आणि विनय सप्रू यांनी केले आहे. तर या सिनेमाचे टीझर उद्या प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती दिव्याने दिली आहे. तसेच या सिनेमाचे टीझर उद्या प्रदर्शित होणार असल्याचे दिव्यानं यावेळी सांगितले आहे. यारियां 2 मध्ये एक पूर्णपणे फ्रेश आणि हटके जोडी पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसाखाली टी-सीरीजने (T-Series) आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

यामध्ये त्यांनी कॅप्शन लिहिला आहे की, ‘कजिन्स बाय ब्लड, फ्रेंड्स बाय चॉईस’. या कॅप्शनने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. सिनेमाच्या हटके पोस्ट आणि त्यावरील कॅप्शनमुळे चाहत्यांनी अनेक प्रकारचे अंदाज लावत असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘यारियां २’ उद्या १० ऑगस्ट दिवशी सोशल मीडियावर प्रदर्शित करणार आहेत. तर ही सिनेमा २० ऑक्टोबरला सिनेमा गृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. यारियांचा पहिला भाग देखील राधिका राव आणि विनय सप्रू यांनी दिग्दर्शित केळ्याचे पाहायला मिळाले होते. ‘गदर 2’ आणि ‘OMG 2’ या गाजलेल्या सिनेमाच्या सिक्वलनंतर आता ‘यारियां 2’ च्या सिक्वलची देखील आणखी भर पडल्याचे पाहायला मिळत आहे. यारिया सिनेमामध्ये मैत्री, प्रेम या नात्यावर आधारित आहे. यामुळे ‘यारिया 2’ मध्ये काय नवीन बघायला मिळणार यासाठी चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत असल्याचे पाहायला मिळत आहे. सिनेमा २० ऑक्टोबर २०२३ ला प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *