Subhedar Trailer: प्रदर्शनापूर्वीच ‘सुभेदार’ सिनेमाचा नवा विक्रम, ट्रेलरला लाखोंची पसंती

  • Subhedar Trailer* : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या ‘सुभेदार’ (Subhedar Trailer) या मराठी सिनेमासाठी चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत असलयाचे पाहायला मिळत आहे. या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला अवघ्या काही तासातमध्ये  हजारो व्ह्यूज मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. या ट्रेलरला चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे. चाहत्यांनी या ट्रेलरवर लाइक्स आणि कमेंट्सचा चांगलाच वर्षाव करत असल्याचे बघायला मिळत आहे. 

१८ ऑगस्ट दिवशी हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. परंतु या ट्रेलरने नुकताच एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. विशेष म्हणजे या ट्रेलरचे व्ह्यूज कायम वाढत आहे. चाहत्यांनी सिनेमाच्या ट्रेलरला चांगलेच उचलून धरले आहे. काही तासांतच या ट्रेलरने अनोखा कमाल केल्याचे पाहायला मिळत आहे. या सिनेमाचा भन्नाट ट्रेलर बघून चाहते थक्क झाले आहेत. सुभेदार सिनेमाच्या ट्रेलरमध्ये “आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं…” हा डायलॉग ऐकायला मिळत आहे. सुभेदार सिनेमाच्या ट्रेलरमधील कलाकारांच्या अभिनयानं अनेकांचे चांगलेच लक्ष वेधले आहे.

सिनेमाचा ट्रेलर सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर एका दिवसामध्येच त्याने अनोखा विक्रम केल्याचे बघायला मिळाले आहे. हा ट्रेलर यू ट्यूबवर १ नंबरवर ट्रेंड होत आहे. हा आतापर्यंतच्या सगळ्या मराठी सिनेमाच्या ट्रेलर्सपैकी सर्वात कमी वेळामध्ये सर्वात जास्त बघितला गेलेला ट्रेलर बनला आहे. ‘सुभेदार’ हा सिनेमा येत्या १८ ऑगस्ट दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) हे सुभेदार या सिनेमात  तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारले असल्याचे पाहायला मिळत आहे. तर चिन्मय मांडलेकर हा छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारला आहे.

‘सुभेदार’ या आगामी सिनेमात मृणाल कुलकर्णी जिजाऊ आईसाहेबांच्या, विराजस जीवाच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. यशोदाबाई मालुसरेच्या भूमिकेमध्ये शिवानी रांगोळे दिसून येणार आहेत. फर्जंद, फत्तेशिकस्त अशा सिनेमातील अजय पुरकर यांच्या अभिनयाला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली आहे. आता अजय पुरकर यांच्या ‘सुभेदार’ या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असल्याचे बघायला मिळत आहे. ‘सुभेदार’ या सिनेमात चाहत्यांना तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा सुवर्ण इतिहास मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा दिग्पाल लांजेकर यांनी सांभाळली असल्याचे बघायला मिळत आहे. हा सिनेमा १८ ऑगस्ट २०२३ दिवशी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *