Manipur Violence : ‘हिंसाचार अदानींसाठीच..,’; प्रकाश आंबेडकरांचा दावा

Manipur Violence : मणिपूरध्ये मागील तीन महिन्यांपासून दोन समाजात हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यावरुन देशात संतापाची लाट उसळलेली असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी मोठा दावा केला आहे. हिंसाचार उद्योजक गौतमी अदानी यांच्यासाठी घडवला जात असल्याचा गंभीर आरोप आंबेडकरांनी केला आहे. आंबेडकरांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, मणिपुरमध्ये सोन्यापेक्षा महाग असलेल्या प्लॅटिनम खनिजाची खाण सापडली आहे. या खाणींच्या उत्खननाचं कंत्राट
गौतम अदानीला दिलं आहे, त्यावरुन आदिवासी समाजाकडून विरोध केला जात असल्यानेच हिंसाचार घडवला जात असल्याचे ते म्हणाले आहेत.

मागील सहा महिन्यात मैतेई समुदायाने आरक्षणाची मागणी केली, अशी एकही बातमी समोर आली नव्हती. कुठल्याच वर्तमानपत्रात अशी बातमी वाचली नाही. मग केंद्र सरकारने अचानकपणे मैतेई समुदायाला आदिवासी म्हणून आरक्षण देण्याचं का घोषित केलं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

राज्यघटनेनूसार आदिवासी समाजाच्या वस्त्यांवर ‘आदिवासी काऊन्सिल’ असतात. ज्या भागात आदिवासी समुदायाचा रहिवास आहे. त्या ठिकाणी काही करायचं असल्यास आदिवासी काऊन्सिलची परवानगी आवश्यक असते, असं असतानाही पंतप्रधान मोदींनी खाणींचं कंत्राट अदानींना दिलं आहे, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत मणिपूरमधील दोन समुदायांमधील हिंसाचार हा जमिनींचे अधिकारी आणि आरक्षणावरुन सुरु असल्याचं समोर आलं होतं. मात्र, आता प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता हा हिंसाचार नेमका कोणत्या कारणाने सुरु आहे? हा प्रश्न सर्वांनाचं पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *