थलायवाच्या ‘Jailer’ रीलीज वर चाहत्यांनी सिनेमागृहाबाहेर केलं सेलिब्रेशन Video Video

  • Jailer* : दाक्षिणात्य सिनेमासृष्टीतील सुपरस्टार थलायवा म्हणजेच रजनीकांत (Rajnikanth) यांचा मोस्ट अवेटेड सिनेमा ‘जेलर’ (Jailer) आज (10 ऑगस्ट) जगभरात प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा तमिळ भाषेत आहे. तसेच तेलुगू आणि हिंदीमध्ये या सिनेमाचा डब करण्यात आला आहे. थलायवा यांचा हा सिनेमा प्रदर्शित होताच चाहत्यांनी सिनेमागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे बघायला मिळत आहे.

ज्यामध्ये थलायवा यांचे चाहते सिनेमागृहाबाहेर आणि ‘जेलर’ सिनेमाचा शो सुरु असताना मोठ्या प्रमाणात जल्लोष करत असल्याचे बघायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई आणि बंगळुरूमधील काही कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना १० ऑगस्ट म्हणजेच (आज) ‘जेलर’च्या प्रदर्शितच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

जेलर सिनेमाच्या माध्यमातून थलायवा हे २ वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर आगमन केले आहे. ‘जेलर’ या सिनेमामधील गाण्यांना चाहत्यांची मोठी पसंती मिळत असलयाचे पाहायला मिळत आहे. या सिनेमामधील ‘कावाला’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या गाण्यावरील रिल्सचे व्हिडीओ अनेक चाहत्यांनी तसेच सेलिब्रिटींनी शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे.

या सिनेमातील गाण्यात तमन्नाच्या डान्सला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित आणि सन पिक्चर्सच्या बॅनरखाली बनलेल्या ‘जेलर’ या सिनेमामध्ये थलायवा यांच्याबरोबर मोहनलाल, जॅकी श्रॉफ, रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन आणि योगी बाबू या कलाकरांनी मुख्य भूमिकेत दिसून आले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *