कितीही नावं बदलंली तरी खरं रूप समोर येईल; इंडिया नावावरून मोदींचा विरोधकांवर निशाणा

PM Modi on No Confidence Motion : कॉंग्रेस इतकं अंहंकारी आहे त्यांना जमीन दिसत नाही. त्यांच्यावर जनतेचा विश्वास नाही. तर कॉंग्रेसचा देशविरोधातील गोष्टींवर विश्वास आहे. त्यांच्या अनेक राज्यातील सरकारांवर अविश्वास प्रस्ताव आलेला आहे. कॉंग्रेस आणि विरोधकांनी कितीही नावं बदलंलं तरी त्यांचं खरं रूप समोर येईल. असं म्हणतं नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस आणि विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (PM Modi Criticized Parlement Session No Confidence Motion)

लोकसभेत आज तिसऱ्या दिवशी अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. आजही सभागृहात गोंधळ सुरू आहे. त्यात आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज संसदेत पंतप्रधान मोदी हे विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देत आहेत. यावेळी अधिवेशनात फिल्डिंग विरोधकांची पण सत्ताधाऱ्यांनी चौकार अन् षटकार मारल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

कॉंग्रेसवर काय म्हणाले मोदी?

जगाला दिसत असलेल्या देशाच्या विकासावर कॉंग्रेससह विरोधकांचा अविश्वास आहे. त्यांच्या रक्तातच अविश्वास आहे. ते जनतेचा विश्वास पाहू शकत नाही. माझं जुन्या विचारांवर विश्वास नाही पण देशाचं जे जगभार कौतुक होत आहे. त्यावर विरोधकांनी संसदेत काळे कपडे घालून या विकासाला दृष्ट लागू नये म्हणून काळी टीत लावली आहे. अनेक वाईट शब्दांचा वापर केला. चांगल आहे त्यांच मन मोकळं झालं असेल. तर मोदी तेरी कब्र खुलेगी ही त्यांची आवडती घोषणा आहे. पण मी त्याचं टॉनिक बनवतो.

आज या सभागृहात गुपित सांगणार आहे. ते म्हणजे विरोधकांना एक वरदान मिळालेलं आहे. ते ज्यांचं वाईट चिंततात त्यांच जास्त चांगलं होतं. त्याचं मी एक उदाहरण आहे. एचएएल या सरकारी सैन्याच्या हेलिकॉप्टर बनवणाऱ्या कंपनीबद्दल विरोधकांनी अफवा पसरवल्या होत्या. कामगारांना भडकवलं होतं. पण ती ही आज यशाच्या शिखरावर आहे. एलआयसीचं देखील तसंच झालं.

मी नुकतचं म्हणालो की, आमच्या तिसऱ्या टर्ममध्ये देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल पण कॉंग्रेसचे लोक म्हणतात त्यासाठी काही करण्याची गरज नाही. त्यामुळे एवढे वर्ष सत्तेत असूनही हे अनुभव शुन्य असल्यासारखं बोलतात. त्यामुळे ते इतके वर्ष झोपलेले आहेत. त्यांच्याकडे निती, नियत आणि जागतिक अर्थव्यवस्थेचं ज्ञान, दृष्टीकोन नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या काळात देशात गरिबी वाढली.

कॉंग्रेस इतकं अंहंकारी आहे त्यांना जमीन दिसत नाही. त्यांच्यावर जनतेचा विश्वास नाही. तर कॉंग्रेसचा देशविरोधातील गोष्टींवर विश्वास आहे. त्यांच्या अनेक राज्यातील सरकारांवर अविश्वास प्रस्ताव आलेला आहे. कॉंग्रेस आणि विरोधकांनी कितीही नावं बदलंलं तरी त्यांचं खरं रूप समोर येईल. असं म्हणतं नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस आणि विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *