Poet Gaddar Death : प्रसिद्ध गायक गुम्मडी विठ्ठल राव उर्फ गदर यांचं निधन!

तेलंगणाचे प्रसिद्ध गायक गुम्मडी विठ्ठल राव उर्फ गदर यांचं निधन झालं आहे. गदर यांच्यावर हैद्राबाद एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांनी 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

गदर यांना फुफ्फुस आणि लघवीचा त्रास होता. हृदयविकाराच्या गंभीर आजाराने ते ग्रासलेले होते. 20 जुलै रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, 3 ऑगस्ट रोजी त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि ते बरेही झाले होते. पण, त्यांना फुफ्फुस आणि लघवीच्या समस्या देखील होत्या.

गदर यांचे अनेक क्रांतिकारी गीत प्रसिद्ध आहेत. गुम्मडी विठ्ठल राव हे त्यांच्या रंगमंचाच्या नावाने लोकप्रिय होते. त्यांना हृदयविकाराचा गंभीर आजार असल्याने त्यांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, गदर यांच्या निधनानंतर अनेक दिग्गज नेत्यांसह कलाकारांनी दुख: व्यक्त केलं आहे.’तेलंगणातील प्रख्यात कवी, गीतकार आणि कार्यकर्ते श्री गुम्मडी विठ्ठल राव यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झालं’ असं ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *