मणिपूरमध्ये गेल्या 24 तासात 6 ठार, 16 जण जखमी; अनेक भागांत गोळीबार-जाळपोळ सुरूच

Manipur violence : मणिपूरमध्ये मागील 3 महिन्यांपासून सुरू असलेला हिंसाचार थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीत. आताही मणिपूरच्या तणावपूर्ण भागात पुन्हा एकदा हिंसाचार झाला. शनिवारी सकाळपासून बिष्णुपूर-चुराचंदपूर सीमा भागात मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडल्या. यात गेल्या २४ तासांत पिता-पुत्रासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे या भागात लष्कराला पाचारण करण्यात आले असून लष्कराच्या जवानांनी या भागात शोधमोहीम सुरू केली आहे. गोळी लागल्याने जखमी झालेल्या बंडखोराला लष्कराने ताब्यात घेतले आहे. (manipur violence 6 dead 16 injured in 24 hours)

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (5 ऑगस्ट) बिष्णुपूर-चूरचंदपूर सीमेवर अनेक ठिकाणी मोर्टार आणि ग्रेनेड हल्ले झाले.
बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाकटा भागातील एका गावात शनिवारी सकाळी झालेल्या हल्ल्यात पिता-पुत्रासह तीन गावकरी ठार झाले. वास्तविक, 3 मे पासून या भागातील परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे या गावांतील लोकांना मदत छावण्यांत हलवण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी या गावातील काही लोक आपापल्या घरी परतले होते. गावकरी गावात परतल्यानंतर काही तासांनी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाच गावातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

‘अजितदादा मैत्रीचा तर पक्का आहेच पण..,’ वडेट्टीवारांचा मिश्किल अंदाजात टोला

सुरक्षा दलातील सूत्रांनी सांगितले की, काल संध्याकाळी या परिसरात झालेल्या हत्यांपैकी दोन जणांना खूप जवळून गोळ्या घातल्या आहेत. तसंच गोळ्या झाडण्यापूर्वी त्यांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले होते. दरम्यान, राज्यातील अनेक भागांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आज (6 ऑगस्ट) इंफाळ पूर्व आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये संचारबंदी शिथिल केली जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

याशिवाय, बिष्णुपूर जिल्ह्यातील तेराखोंसांगबी येथे एकाच वेळी झालेल्या हल्ल्यात एक जण ठार झाला आणि पोलिस कमांडोसह तीन जण गोळीबारात जखमी झाले.

इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील सनासाबी आणि थमनापोकपी गावात अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याचे वृत्त आहे. तर इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील लांगगोल येथेही अज्ञात जमावाने घरे जाळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *