चंद्राच्या कक्षेत पोहोचताच चांद्रयानाचा पहिला मेसेज; मला चंद्राचं गुरुत्वाकर्षण…

ISRO Chandrayaan-3 Mission : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) चांद्रयान-3 मोहिमेसाठी कालचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला. वास्तविक, या यानाने 4 ऑगस्ट रोजी दोन तृतीयांश अंतर पूर्ण केले. त्याच वेळी, एका दिवसानंतर यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. त्यानंतर चांद्रयान -3 चंद्राच्या कक्षेत पोहोचताच त्याने इस्त्रोला खास मेसेज पाठवला.

“MOX, ISTRAC, this is Chandrayaan-3. I am feeling iunar gravity.” असा संदेश यानाने पाठवला. मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स (mox), ISTRAC, बंगळुरू, हे चांद्रयान-3 आहे. मला चंद्र गुरुत्वाकर्षण जाणवत आहे. इस्रोने शुक्रवारी सांगितले की, चांद्रयान-3 अंतराळ यानाने 14 जुलै रोजी प्रक्षेपण केल्यापासून चंद्राचे दोन तृतीयांश अंतर कापले आहे. आतापर्यंत चांद्रयान-3 ने पाच वेळा कक्षा पार प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

चांद्रयान-3 सॉफ्ट लँडिंग कधी करणार?

1 ऑगस्ट रोजी यानाला पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेने पोहचण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आणि यानाला ‘ट्रान्सलुनर ऑर्बिट’मध्ये ठेवण्यात आले आहे. यापूर्वी, इस्रोने म्हटले होते की ते 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 सॉफ्ट लँड करण्याचा प्रयत्न करेल.

इस्त्रोने ट्विटमध्ये म्हटले आहे की चंद्राच्या कक्षेत चांद्रयान-3 ने यशस्वीरित्या प्रवेश केला आहे. पुढील ऑर्बिट रिडक्शन ऑपरेशन रविवारी रात्री 11 वाजता केलं जाईल. इस्त्रोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 100 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत असलेल्या उपग्रहाला चंद्राच्या जवळ आणण्यासाठी आणखी चार ऑर्बिट रिडक्शन ऑपरेशन केले जाणार आहेत.

मागील 14 जुलै रोजी चांद्रयान-3 लाँच करण्यात आले होते. तेव्हापासून या यानाने चंद्राच्या अंतराच्या दोन तृतीयांश अंतर पूर्ण केले आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत पोहोचताच या यानाने पहिला संदेश पाठवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *