भारतात उजळलं पाकिस्तानी सीमाचं नशीब; सहा लाखांच्या नोकरीसह मिळालं चित्रपटात काम

Seem Haider : पब्जीवरुन ओळख झाली अन् आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी नेपाळमार्गे भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदरबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे भारतात आल्यावर पाकिस्तानी सीमाचं नशीब उजळलं आहे. तिला सहा लाखांच्या नोकरीसह चित्रपटात काम मिळालं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिचा पति सचिन आर्थिक विवंचनेत असल्याची बातमी मिळाली होती. त्यानंतर आता थेट सिमाला सहा लाखांच्या नोकरीसह चित्रपटात काम मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केल जात आहे. ( Seem Haider got 6 laks salary job and movie in india )

सीमाला चित्रपट कसा मिळाला?
सीमा हैदरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर भारताच्या बॅजसह एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ लोकांना आवडला. यामध्ये बॅकग्राऊंडला भारताची भक्ति गीत गायले जाता आहेत. तिला अद्याप भारताच नागरिकत्व मिळालेलं नाही. पण या व्हिडीओवरून स्पष्ट दिसत आहे की, ती स्वतः ला भारतीय मानते.

असं सांगितल जात आहे की, सीमा हैदर चा पति सचिन आर्थिक विवंचनेत असल्याची बातमी मिळाली होती. त्यानंतर आता थेट सिमाला सहा लाखांच्या नोकरीसह चित्रपटात काम मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केल जात आहे. मेरठ मधील अमित जानी या प्रोड्युसरने तिला काम दिलं आहे. त्यांनी तिला चित्रपटात काम करण्याची ऑपर दिली आहे.

तर दुसरीकडे तिला सहा लाखांची नोकरीही मिळाली आहे. ती रबूपूरा येथे राहते. तेथे एक निनावी पत्र आलं आहे. त्यामध्ये गुजरातच्या एका उद्योगतीने तिला तब्बल सहा लाखांच्या नोकरीची ऑफर दिली आहे. तसेच ते दोघ देखील ही नोकरी जॉईन करू शकणार आहेत. सोशल मिडीयावर याची चांगलीच चर्चा सुरू. तसेच याबद्दल आश्चर्य व्यक्त केल जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *