नितीन देसाईंच्या निधनानंतर अक्षय कुमारने घेतला मोठा निर्णय! आगामी चित्रपट ‘ओएमजी 2’….

Nitin Desai Suicide : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी (Nitin Chandrakant Desai) गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये नितीन चंद्रकांत देसाईंनी आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या निधनावर सर्वच क्षोत्रातून दुःख व्यक्त केले जात आहे. त्यात आता अभिनेता अक्षय कुमारने दुःख व्यक्त करत एक मोठा निर्णय घेतला आहे. ( Bollywood Actor Akshay Kumar canceled trailer release of OMG 2 due to Nitin Desai Suicide )

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या निदनावर शोक व्यक्त करत त्याने त्याच्या आगामी चित्रपट ‘ओएमजी 2’ चा ट्रेलर लॉन्च रद्द केले आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात येणार होता. मात्र आता आज ऐवजी हा ट्रेलर उद्या रिलीज होणार आहे. याबद्दल अक्षयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर माहिती दिली.

काय म्हणाला अक्षय कुमार?

देसाईंचं निधन आणि आगामी चित्रपट ‘ओएमजी 2’ चा ट्रेलर लॉन्च याबद्दल अक्षयने लिहिले की, नितीन देसाईंच्या निधनाने अत्यंत दुःख झाले. ते प्रोडक्शन डिझाईनमध्ये दिग्गज होते. तसेच ते आमचे चित्रपट क्षेत्रातील बंधू होते. त्यांनी अनेक चित्रपटांवर काम केले. त्यांच्या जाण्याने मोठ नुकसान झालं आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान आणि दुःखात आम्ही आगामी चित्रपट ‘ओएमजी 2’ चा ट्रेलर लॉन्च रद्द केले आहे. तो उद्या दुपारी 11 वाजता रिलीज केला जाईल. ओम शांती.

दरम्यान अक्षय कुमार याचा ‘ओएमजी २’ हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. यावेळी एक वेगळीच कथा या सिनेमात बघायला मिळणार आहे. या सिनेमाची कथा लैंगिक शिक्षणाभोवती फिरत असल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमाला वादांपासून दूर ठेवण्यासाठी सिनेमात कोणाच्याही भावना कोणत्याही प्रकारे दुखावल्या जाणार नाहीत, याची निर्मात्यांनी विशेष काळजी घेतली आहे. अमित राय दिग्दर्शित ‘ओएमजी २’ या सिनेमाची टक्कर सनी देओलच्या ‘गदर २’सोबत असल्याचे बघायला मिळणार आहे. या दोन्ही सिनेमाबद्दल चाहते मोठ्या प्रमाणात वाट पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *