टीम इंडिया सुसाट! तिसऱ्या वनडेत मोठा विजय, मालिकाही जिंकली

IND vs WI : भारतीय संघाने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्टइंडिड संघाचा तब्बल 200 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेत मालिका विजय साकारला. पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी सुमार राहिली. तिसऱ्या सामन्यात मात्र फलंदाजांनी ही कसर भरून काढली.

याआधी दुसऱ्या एकदिवसीय टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला होता. तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत मात्र गोलंदाज आणि फलंदाजांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवले. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 350 धावांचा डोंगर उभा केला. त्यामुळे आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा संघ सुरुवातीपासूनच दबावात होता. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 त मुकेश शर्माने 3 विकेट्स घेतल्या. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने 2 विकेट्स घेत त्यांना साथ दिली.

या कठीण आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या वेस्ट इंडिज संघाची अवस्था सुरुवातीच्या 7 ओव्हर्समध्ये 3 बाद 17 अशी बिकट झाली होती. भारतीय संघाचा गोलंदाज मुकेश शर्मा, जयदेव उनाडकट यांनी चांगली गोलंदाजी केली. नियमित अंतरावर विकेट्सही मिळवल्या. त्यामुळे विजयाचा मार्ग सोपा झाला.

विंडीजने अर्धशतक गााठायच्या आतच शार्दुल ठाकूरने रोमारियो शेफर्डला बाद केले. विंडीजची अवस्था 6 बाद 50 अशी अवस्था झाली होती. यानंतर एक बाजू लावून धरलेल्या अलिक अथनाजेला कुलदीप यादवने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. अथनाजेने 32 रन केले. त्यानंतरही गळती सुरुच राहिली. 8 बाद 88 अशी अवस्था झाली होती. त्यामुळे आता 100 च्या आतच संघ तंबूत परतेल असे वाटत होते. मात्र, अल्झारी जोसेफ (26) आणि गुडाकेश मोती (39) यांनी काही झुंज दिली. या दोघांनी नवव्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारतीय संघाचा विजय थोडा लांबला. शार्दुल ठाकूरने जोसेफची विकेट घेत ही भागीदारी तोडली. त्यानंतर सिल्सला (1) बाद करत भारताचा विजय साकारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *