Box Office: ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची घोडदौड सुरुच; 4 दिवसांत 50 कोटींचा आकडा पार

  • Rocky Aur Rani Ki Prem Kahani Box Office Collection * : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालतअसल्याचे पाहायला मिळत आहे. या सिनेमाने वीकेंडला चांगली कमाई केल्यानंतर आता या चित्रपटाने रिलीजच्या ४ दिवसामध्ये ५० कोटींचा टप्पा पार केल्याचे पाहायला मिळले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी चांगलीच ओपनिंग केल्याचे पाहायला मिळाले आहे. (Rocky Aur Rani Ki Prem Kahani Opning Day Collection) पहिल्याच दिवशी ११.१ कोटींची मोठी कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी १६.०५ कोटी, आणि तिसऱ्या दिवशी १८.७५ कोटी, चौथ्या दिवशी ७.५० कोटींची मोठी कमाई केल्याचे पाहायला मिळाले आहे. एकंदरीत आतापर्यंत या चित्रपटाने ५३.४० कोटींचा मोठा गल्ला कमावला आहे.

‘ओपनहाइमर’ (Oppenheimer), ‘बार्बी’ (Barbie) हे हॉलिवूड चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर मोपथ्य प्रमाणात गल्ला जमवत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) या मराठी चित्रपटाचा देखील बॉक्स ऑफिसवर चांगलाच बोलबाला बघायला मिळाले आहे. तसेच आलिया- रणवीरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची देखील चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. वीकेंडला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत असल्याचे दिसत आहे. तसेच २०२३ मधील सर्वाधिक ओपनिंग कलेक्शन करणारा हा ५ चित्रपट ठरणार आहे.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. तर धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी, आमिर बशीर, तोता रॉय चौधरी, चूर्णी गांगुली, क्षिती जोग आणि अंजली आनंद हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसले आहेत. करण जोहर दिग्दर्शित (Karan Johar) हा चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. करणने ७ वर्षांनी या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *