Baipan Bhari Deva ने दिली हॉलिवूड सिनेमाला टक्कर, ३० दिवसात कमावले ‘इतके’ कोटी

  • Baipan Bhari Deva Box Office Collection* : हा सिनेमा प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यासोबतच नवनवीन अनेक रेकॉर्ड करत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Box Office Collection) केदार शिंदे (Director Kedar Shinde) दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) या हटके सिनेमाने प्रदर्शनाच्या अगोदरपासूनच चाहत्यांमध्ये आपला चांगलाच दबदबा निर्माण केला होता. ६ बहिणींच्या कथेच्या माध्यमातून ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाने प्रत्येक स्त्रीला जगण्याचा नवा अर्थ देत स्वतःसाठी जगायला शिकवले आहे. सिनेमाच्या प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर त्याची सुरू असलेली घोडदौड चाहत्यांच्या चांगलीच पसंतीची मोठी पोचपावती म्हणावी लागणार आहे. हा सिनेमा प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करण्यासोबतच नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवताना पाहायला मिळत आहे. आता ३० दिवसात या सिनेमाने किती गल्ला कमावला आहे. चला तर मग जाणून घेऊया…

नुकताच दिग्दर्शिक केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सिनेमाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली याबद्दल माहिती दिली आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाला आता ३० दिवस म्हणजेच १ महिना पूर्ण झाला आहे. ३० दिवसामध्ये या सिनेमाने ७०.२० कोटी रुपयांचा मोठा गल्ला कमावला आहे. ही कमाई शेअर करत केदार शिंदे यांनी “हॉलिवूड-बॉलिवूडच्या गर्दीतला मऱ्हाठमोळा ‘भारी’ आकडा” असे कॅप्शन यावेळी त्यांनी लिहिले आहे.

तसेच रसिक चाहत्यांच्या रुपामध्ये परमेश्वर प्रत्येक सिनेमागृहात अवतरला आणि पदरात दान टाकून गेला.. अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. परमेश्वर साथ सोडणार नाही, याची मला चांगलीच खात्री आहे. ‘श्री स्वामी समर्थ महाराज की जय’. श्री सिध्दीविनायक महाराज की जय” असे त्यांनी या पोस्टला कॅप्शन दिल्याचे पाहायला मिळत आहे. ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाने पहिल्याच आठवड्यामध्ये बॉक्सऑफिसवर तब्बल १२.५० कोटींची मोठी कमाई केल्याचे पाहायला मिळाले आहे. एवढेच नाही तर प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी एका दिवसांत ६.१० कोटींची कमाई करणारा हा पहिला मराठी सुपरहिट सिनेमा ठरला होता.

दुसऱ्या आठवड्यामध्ये २४.८५ कोटींचा गल्ला जमवत एकूण ३७.३५ कोटींची मोठी कमाई केल्याचे पाहायला मिळाले आहे. म्हणजेच पाहिल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये दुसऱ्या आठवडयाची कमाई डबल झाल्याची पाहायला मिळाले आहे. आता तिसऱ्या आठवड्यामध्ये देखील या सिनेमाने चांगली कमाई केली आहे. एकूण सिनेमाने ७० कोटी रुपयांची मोठी कमाई केल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाची निर्मिती माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओजने केली आहे. या सिनेमाचे सह-निर्माते बेला शिंदे आणि अजित भुरे हे आहेत.

‘बाईपण भारी देवा’ सिनेमात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशी अभिनेत्रींची तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली आहे. सिनेमातील कलाकारांचा उत्तम अभिनय, उत्कृष्ट कथानक, सुरेल गाणी अन् दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या अष्टपैलू दिग्दर्शनामुळे बॉक्सऑफिसवर मराठी सिनेमाचा अनेक दिवसांनी बोलबाला झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *