रिल्स एक विलक्षण हत्यारच, समाजाला गुंतवण्याची मोठी ताकद; राज ठाकरेंचं रिल्सस्टार तरुणांना आवाहन

रिल्स एक विलक्षण हत्यार तुमच्या हातात आहे, त्यामध्ये समाजाला सुख-दुख: विसरुन गुंतवण्याची मोठी ताकद असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला आज 17 वर्षे पूर्ण झाले, या पार्श्वभूमीवर मुंबईत आज रिल्सबाज पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज ठाकरे बोलत होते.

ठाकरे म्हणाले, डान्सबार बंद झाल्यानंतरच त्यावेळची सवय रिल्सच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. सध्याच्या जगात रिल्स एक कमाल विलक्षण हत्यार आज तुमच्या हातात आलं आहे, या रिल्सच्या माध्यमातून महाराष्ट्राचं प्रबोधनही झालं पाहिजे, रिल्स गंमतीपूरता मर्यादित असता कामा नये, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

तसेच आजच्या कार्यक्रमात अधिक बोलणार नसून अमित सांगितल्याने मी या कार्यक्रमाला आलो आहे. मी फारसं घरच्यांच्या विरोधात मी जात नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरेंनी घरच्यांविरोधात जात नसल्याचं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.

रिल्सस्टार जे करीत आहेत, ते किती मोलाचं याची जाणीव असणं गरजेचं आहे, कारण पाकिस्तानातून देशात पाकिस्तानातून अनेक कलाकार येतात पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात. आपल्या देशात अनेक कलाकार ,लेखक झाले. ही जी विविध अंग आहेत आज त्यामध्ये तुम्हीही येत असल्याचं ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, राज ठाकरेंनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर कार्यकर्त्यांकडून ‘लव्ह यू’ म्हणण्यात आलं होतं. त्यावर राज ठाकरे यांनी देखील लव्ह यू म्हणत प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी मायकल जॅकसन यांच्या आवाजात लव्ह यू, अशी नक्कल देखील केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *