पुण्यामध्ये छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चित्ररुपी प्रवासाला उजाळा

  • Pune News * : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज १ ऑगस्ट जयंती आहे. या जयंतीनिमित्त एआय (AI) तंत्रज्ञानाने विकसित केलेले साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या दुर्मिळ फोटोंचे छायाचित्र प्रदर्शन आज पुण्यामध्ये आयोजित करण्यात आले आहे. या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चित्ररुपी प्रवासाला उजाळा मिळाला आहे. (Annabhau Sathe Jayanti ai pictorial journey to Pune from today)

देशात पहिल्यांदा असे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. दुर्मिळ फोटोंचे छायाचित्राची संकल्पना आणि निर्मिती संजय श्रीधर कांबळे यांनी केली आहे. या छायाचित्रांच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांचे जीवनपट उलगडला गेला आहे. हे छायाचित्र प्रदर्शन पुण्यामधील सारसबाग येथील साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाजवळ हा कार्यक्रम पार पडला आहे. ३१ जुलै सायंकाळी हे प्रदर्शन खुले करण्यात आले आहे. तर १ ऑगस्टला (आज) संपूर्ण दिवस हे प्रदर्शन खुले राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

संजय कांबळे यांच्या संकल्पनेतून अनेक एआय फोटोज तयार करण्यात आले आहेत. संजय कांबळे हे गेल्या ७-८ वर्षांपासून सोशल मीडिया आणि सोशल कंटेटमध्ये काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून राजकीय नेते उद्धव ठाकरे, अजित पवार, आमदार रोहित पवार, छत्रपती संभाजीराजे भोसले, माजी नगरसेवक वसंत मोरे यांचे फोटोज् तयार केल्याची माहिती मिळत आहे.

प्रसिध्द अभिनेता अमेय वाघ यांचा देखील फोटो त्यांनी तयार केला आहे. संजय कांबळे यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मराठीमध्ये वेगवेगळे व्हिडिओ बनवून, त्यांना ट्रम्प तात्या अशी ओळख दिली आहे. तसेच जागतिक पातळीवरअसलेल्या नेत्यांचे डम्बिग व्हिडिओ देखील त्यांनी तयार केले आहेत. आता त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर एआय तंत्रज्ञान वापरून छायाचित्र बनवल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *