‘द केरळ स्टोरी’नंतर आता अदाची नवी वेब सीरिज चाहत्यांच्या भेटीला; ‘Commando’चा ट्रेलर प्रदर्शित

  • Commando Trailer Out* : अभिमेत्री आदा शर्माच्या (Adah Sharma) ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमाला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली होती. या सिनेमाने अक्षरशः बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केल्याचे पाहायला मिळालं आहे. आता अदा कमांडो (Commando) या वेब सीरिजमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकताच ‘कमांडो’ या वेब सीरिजचा (Web series) ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये अदा शर्माचा हटके अॅक्शन अंदाजात पाहायला मिळणार आहे.

विपुल अमृतलाल शाह यांच्या ‘कमांडो’ या अॅक्शन सीरिजचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या अॅक्शनपॅक्ड सीरिजचा ट्रेलर डिस्ने प्लस हॉटस्टारने (Disney Plus Hotstar) त्यांच्या युट्यूब चॅनलवर या सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. विपुल अमृतलाल शाह निर्मित आणि दिग्दर्शित ‘कमांडो’ या सीरिजच्या ट्रेलरमध्ये प्रेम पारिजा, अदा शर्मा, वैभव तत्ववादी हे हटके कलाकार पाहायला मिळत आहेत.

कमांडो या वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, क्षितीज हा एक गुप्तहेर असल्याचे पाहायला मिळत आहे. तो एका देशात गुप्तहेर म्हणून गेल्याचे पाहायला मिळाले आहे. परंतु क्षितीजला त्या देशामध्ये अटक करण्यात येते आणि त्याला एका तुरुंगामध्ये ठेवल्याचे देखील पाहायला मिळत आहे. तसेच त्यानंतर विराट आणि भावना रेड्डी हे दोघे क्षितीजला त्या तुरुंगातून सुरक्षित आणण्यासाठी धोकादायक मोहिमेवर निघत असल्याचे पाहायला मिळत आहे.

अभिनेता वैभव तत्ववादीनं ‘कमांडो’ या सीरिजमध्ये ‘क्षितीज’ ही भूमिका साकारली आहे. अदा शर्मानं भावना रेड्डी आणि प्रेमनं विराट ही भूमिका साकारल्याचे पाहायला मिळणार आहे. या सीरिजमध्ये तिग्मांशू धुलिया, अमित सियाल, श्रेया सिंह चौधरी, इश्तियाक खान आणि मुकेश छाबरा हे हटके कलाकार देखील मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहेत.

‘कमांडो’ ही वेब सीरिज ११ ऑगस्ट दिवशी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. ‘कमांडो’ ही वेब सीरिज ‘कमांडो’ फ्रँचायझीमधील आहे. ‘कमांडो’ फ्रँचायझीचे ३ सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आले आहे. या सिनेमाची निर्मिती विपुल शाह यांनी केली आहे. कमांडो फ्रँचायझीची सुरुवामध्ये २०१३ मध्ये ‘कमांडो: ए वन मॅन आर्मी’ या सिनेमाने झाली आहे. यामध्ये विद्युत आणि पूजा चोप्रा मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते. आता प्रेम आणि अदा ‘कमांडो’ या वेब सीरीजमध्ये हटके अंदाजात दिसून येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *