मला त्याने डेट करण्याची विनवणी केली, कंगना रनौतने घेतले ‘या’ अभिनेत्याचे नाव

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रनौत तिच्या बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असते. कंगना कधी आलिया भट्ट तर कधी रणबीर कपूर किंवा करण जोहर यांना कंगना टार्गेट करत असते. आता पुन्हा एकदा कंगनाने हृतिक रोशनवर टीका केली आहे. एवढेच नाही तर तिने रणवीर कपूरलाही टार्गेट केलं आहे. (Kangana Ranaut targets Ranbir Kapoor and Hrithik Roshan making serious allegations without naming)

कंगनाच्या नावावर फसवणूक!
अभिनेत्री कंगना रनौतने रविवारी काही पोस्ट शेअर केल्या, ज्यात तिने कोणाचेही नाव न घेता इंडस्ट्रीतील दोन बड्या कलाकारांवर निशाणा साधला. तिने हृतिक रोशन आणि रणबीर कपूर यांची खिल्ली उडवली असल्याचे तिच्या पोस्टवरून स्पष्ट झालं आहे. कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये काही लोकांचे स्क्रीनशॉटही पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये घोटाळ्याशी संबंधित गोष्टी लिहिल्या जातात. एक व्यक्ती तिचा प्रतिनिधी असल्याचे भासवून आणि तिचे खाते हॅक करून इतरांची फसवणूक करत असल्याचे कोणीतरी तिला सांगितल्यानंतर तिने इन्स्टाग्राम स्टोरीजवर अनेक पोस्ट शेअर केल्या. आणि सांगितले की एक घोटाळा कसा सुरू आहे, ज्यामध्ये लोकांचे अकाउंट हॅक करण्यासाठी तिचे नाव वारत आहेत.

सोनू निगमचा 50 वाढदिवस थाटामाटात, दिग्गज नेत्यांसह कलाकारांची मांदियाळी…

घोटाळ्याबाबत खुलासा केला
या घोटाळ्याबद्दल कंगना म्हणाली, “आज सकाळी माझ्या लक्षात आले की फिल्म माफिया एक रॅकेट चालवत आहे, जे माझ्या नावावर अकाउंट हॅक करत आहे.” कंगनाने पुढे एका चित्रपटाचे नाव न घेता त्याची खिल्ली उडवली आणि म्हणाली “माझा या व्यक्तीशी काहीही संबंध नाही आणि असे कोणतेही ऑनलाइन व्यवस्थापक नाहीत, ही टोळी आहे चंगु मंगू… ज्याचा चित्रपट सुट्टीच्या दिवशीही मणिकर्णिका (रु. 18 कोटी) च्या ओपनिंग कलेक्शनशी बरोबरी करू शकला नाही. लोक त्यांच्या फंदात पडणार नाहीत.

हृतिक रोशनबद्दल काय म्हणाली कंगना?
कंगना रनौत तिच्या पोस्टमध्ये अनेक दावे केले आहेत. अभिनेत्रीने लिहिले की, मी ज्या सुपरस्टारला डेट केले होते. त्याने माझ्याशी चॅट करण्यासाठी वेगवेगळे नंबर आणि अकाउंट वापरले. त्याने माझे अकाऊंटही हॅक केले.

रणबीर कपूरलाही केले टार्गेट!
कंगनाने पुढे कोणाचेही नाव न घेता लिहिले, माझ्या घरी एक वुमनायझर सुपरस्टार आला, त्याने मला डेट करण्याची विनंती केली आणि मला आनंद दिला, पण तो मला लपून-छपून भेटत राहिला, जेव्हा मी या संदिग्ध वागणुकीवर आक्षेप घेतला तेव्हा तो म्हणाला, त्याचं प्रेम नव्हंत, तो फक्त डेट करत राहिला. हे मला मान्य नव्हते आणि मी त्याला पुढं नकार दिला. मग त्याने वेगवेगळ्या नंबरवरून मला मेसेज केले. यूजर्सच्या मते, कंगनाची ही पोस्ट रणबीर कपूरकडे बोट दाखवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *