‘त्या’ दिवशी काँग्रेसमध्ये स्फोट होईल, अनेक आमदार भाजपच्या संपर्कात; प्रवीण दरेकरांचं मोठं वक्तव्य

Pravin Darekar On Congress : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले आहे. यापूर्वी हे पद राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याकडे होते. पण अजित पवार राष्ट्रवादीत बंड शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळेच विरोधी पक्षनेतेपद सध्या रिक्त आहे. विधानसभेत शिवसेनेचे (UBT) केवळ 15 आमदार आहेत, तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडेही 15 ते 20 आमदार आहेत. अशा परिस्थितीत आता विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाऊ शकते. मात्र काँग्रेसने अद्याप विरोधी पक्षनेता निवडलेला नाही. दरम्यान, आता भाजप आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी मोठे वक्तव्य केलं. ज्या दिवशी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची निवड होईल, त्या दिवशी काँग्रेसमध्ये स्फोट होईल, असं विधान त्यांनी केलं. (Pravin Darekar On Congress over opposition leader)

विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसने दावा केल्यानंतर आता काँग्रेसकडून कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशा स्थितीत आता विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नेते सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. याचं संदर्भात विरोधी पक्षनेतेपदाविषयी विचारले असता, दरेखर म्हणाले, ज्या दिवशी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची निवड होईल, त्या दिवशी काँग्रेसमध्ये स्फोट होईल. काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. आत्ता आकडे सांगू शकत नाही. पण, राज्याच्या हितासाठी भाजपसोबत सर्वच पक्षांतील चांगले लोक एकत्र आले तर तर त्याचं स्वागत आहे, असं दरेकर म्हणाले.

Sangli News : संभाजी भिडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक; तर काँग्रेसनेही सांगितली निषेधाची तारीख

जो पक्ष आपला विरोधी पक्ष नेता ठरवू शकत नाही तो 24 जागा कशा जिंकणार? त्यांच्या पक्षातच एकमत व समन्वय नाही. विरोधी पक्षनेता ठरवू शकत नाही, ही त्यांची हतबलता आहे, अशी टीका करत आमची महाआघाडी 24 नाही तर 48 जागा जिंकेल असेही प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. त्यांचे ठाण्यातील भाषण भकटलेलं होतं. ठाण्यात मराठी माणसांची सभा व्हायला हवी होती. पण मराठी माणसे जमतील की नाही, याची चिंता त्यांना होती. मराठी जनता शिंदे साहेबांच्या पाठीशी आहे. उत्तर भारतीयांना आपण काय वागणूक दिली ते देशवासीयांनी पाहिली आहे, असेही दरेकर म्हणाले. आता ते मतांच्या लाचारीसाठी हे सगळं करत आहेत. सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना मळमळ होत असल्याचंही दरेकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *