Shiv Thakare: शिवला भाईजानच्या हिरॉइनचं लागलंय वेड, अफेअरच्या चर्चांना उधाण

  • shiv thakare daisy shah relationship* : मराठमोळा शिव ठाकरे (Shiv Thakare) ‘खतरों के खिलाडी १२'(Khatron Ke Khiladi Season 12) मुळे चर्चेत आहे. रोडीजमुळे प्रसिद्धी झोतात आलेला शिव ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला होता. या शोमुळे त्याला लोकप्रियता मिळाली होती. आणि बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री डेजी शाह (Daisy Shah) ही जोडी सध्या चांगलीच चर्चेत येत आहे.

शिव आणि डेजी अनेकदा सोबत फिरत असल्याचे दिसून येत आहेत. तसेच आता या जोडीने एक सुपर क्यूट रील शेअर केला आहे. ज्यामध्ये ते रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा स्टारर वेड सिनेमातील ‘वेड लावलयं’ या गाण्यावर नाचत असल्याचे दिसत आहेत. तसेच शिव ठाकरे हा कायम चर्चेत असतो. तो सध्या ‘खतरों के खिलाडी १३’ मध्ये दिसत आहे.

गेल्या काही महिन्यापासून ‘खतरों के खिलाडी’ च्या १३व्या पर्वाचे शूटिंग पूर्ण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिव आणि डेझी शाह या दोघांच्या मैत्रीची सुरुवात ‘खतरों के खिलाडी १३’ या शोच्या सेटवर झाल्याचे पाहायला मिळाले आहे, दोघांनी या शोच्या सेटवर खूपच आनंदी क्षण एकत्र घालवले आहेत. शूटिंगनंतर आता दोघांच्यातील मैत्री थोडी पुढे जात असल्याचे दिसत आहे. परंतु सोशल मीडियावर मात्र या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्याची चर्चा रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे.

डेजी शाह ही भाईजान म्हणजेच सलमान खानच्या ‘जय हो’ सिनेमात त्याची हिरॉईन होती, या सिनेमामधून डेजी सर्वांना परिचीत आल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच गेल्या २ दिवसाअगोदर, एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. जो सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी शेअर केला आहे. व्हिडिओत फोटोग्राफर्सना बघून शिव कारची काच खाली करतो आणि काहीतरी बोलणार तेवढ्यात डेझी त्याच्या तोंडावर हात ठेवल्याचे दिसून आले आहेत. आता सगळे हसत असल्याचे देखील बघायला मिळाले आहे.

यानंतर दोघे गाडीमधून उतरून दोघे बाहेर आले. दोघांना एकत्र येत असताना बघून फोटोग्राफर्स म्हणाले आहेत की, व्वा काय जोडी आहे. यावर शिव लाजतो तर डेझी म्हणते, की तुम्ही लोक कॉमेंट्रीशिवाय राहू शकत नाही. नंतर काही फोटो क्लिक केल्यानंतर दोघे निघून गेल्याचे पाहायला मिळाले आहे. सोशल मीडियावरील चाहत्यांना दोघांची जोडी खूपच आवडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *