Sanjay Dutt Birthday: पहिल्या सिनेमानंतर नशेच्या आहारी जाणाऱ्या खलनायकाबद्दलचा नाट्यमय प्रवास!

  • Happy Birthday Sanjay Dutt: * बॉलिवूडमध्ये (Bollywood) ‘बाबा’ म्हणून आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आज (२९ जुलै) आपला वाढदिवस साजरा करत आहे. ‘रॉकी’ या सिनेमातून मनोरंजन क्षेत्रात आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या संजय दत्तने आपल्या अभिनयाने चाहत्यांची कायम मने जिंकत असताना दिसून येतो. ‘नायक’पासून ‘खलनायक’पर्यंत संजय दत्तने अनेक हटके भूमिका साकारले आहेत. संजय दत्तला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधून एका अनोखी ओळख निर्माण केली आहे.

परंतु संजय दत्तच्या रील लाईफप्रमाणे त्याचे रिअल आयुष्य देखील अनेक वादात अडकल्याचे पाहायला मिळत आहे. तारुण्यात असताना संजय दत्तने अनेकदा चुकीचे मातंगाने जात असत. या चुकीच्या मार्गांमुळे नेहमीच तो अडचणीत सापडत होता. त्याच्या आयुष्यामध्ये अनेकवेळा तो संकटांना सामोरे जात होता. संजय दत्तचे निम्मे आयुष्य काहींना काही वादात सापडल्याचे पाहायला मिळाले आहे. संजय दत्त सतत वैयक्तिक आयुष्यामध्ये ड्रग्ज प्रकरणामुळे खूप चर्चेत आला होता. त्यावेळी मुंबईच्या टाडा न्यायालयाने संजय दत्तला शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत ६ वर्षांची शिक्षा सुनावली होती. तर, दुसरीकडे अगदी संजय दत्तचे नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडले होते.

तसेच संजय दत्तला ड्रग्जचं खूप व्यसन असल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक मोठमोठे सिनेमा त्याच्या हातातून निघून गेले होते. १९८१मध्ये संजय दत्तने ‘रॉकी’ सिनेमातून अभिनेता म्हणून एन्ट्री केली होती. या पहिल्या सिनेमाच्या वेळी संजय दत्तला खूप व्यसन लागले होते. सुनील दत्त आपल्या मुलाच्या अमली पदार्थाच्या व्यसनामुळे कायम नाराज असल्याचे बघायला मिळत असतात. त्यावेळी एके दिवशी स्वतः संजय दत्तने आपल्या वडिलांना ड्रग्जच्या व्यसनाविषयी सर्व काही सांगितले. त्यानंतर सुनील दत्त यांनी आपला मुलगा संजय दत्तला घेऊन यूएस रिहॅबिलिटेशन सेंटर गाठल्याचे देखील पाहायला मिळालं होत.

यामुळे संजय दत्त २ वर्षे राहिला होता. त्या दरम्यान त्याच्या मनामध्ये खूपवेळा नशेचा विचार आला होता. मात्र संजय दत्तने ठरवले होते की, तो स्वतः ड्रग्ज घेणार नाही आणि कोणाला नशा देखील करू देणार नाही. संजय दत्तने पहिल्यांदा सिगारेट ओढली होती, त्यावेळेस तो अवघ्या ९ वर्षांचा असल्याचे सांगितले जाते. अनेक निर्माते-दिग्दर्शक सुनील दत्तला भेटायला यायचे आणि उरलेल्या सिगारेट तिथेचटाकून जायचे. त्यावेळेस संजूबाबा ते सिगारेट गुपचूप ओढत असल्याचे त्यांनी एकदा सांगितले होते. संजय दत्तला अभ्यासामध्ये अजिबात रस नव्हता. त्याला सुरुवातीच्या काळात काही सिनेमामध्ये काम करायचे होते. परंतु सुनील दत्त यांनी संजूबाबाला शिक्षणाची अट घातली होती.

मात्र संजय दत्तबद्दल ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती असल्याचे बघायला मिळते. तुरुंगामध्ये शिक्षा भोगत असताना संजूबाबा रेडिओ जॉकी बनून चाहत्यांचे मनोरंजन करत असल्याचे पाहायला मिळाले होते. संजय दत्त त्यावेळेस हिंदी, मराठी आणि  इंग्रजी या भाषेत घोषणा देण्याचे काम करत असायचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *